Noel Tata Net Worth: टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये 66% भागीदारी असलेल्या टाटा ट्रस्टच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. नोएल (67) हे आधीपासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत.
त्यांना रतन टाटा यांचे उत्तराधिकारी बनवले जाईल असे मानले जात होते आणि ट्रस्टने आज त्याला मान्यता दिली. प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आपले काम करायला आवडणारी व्यक्ती म्हणून नोएल यांची ओळख आहे.
नोएल टाटा यांचा जन्म 1957 मध्ये नवल टाटा आणि सिमोन टाटा यांच्या पोटी झाला. त्यांनी यूकेमधील ससेक्स विद्यापीठातून बॅचलरची पदवी मिळवली. टाटा ग्रुपमधील टाटा इंटरनॅशनलमध्ये त्यांनी व्यावसायिक प्रवास सुरू केला.
ही कंपनी टाटांचा विदेशातील व्यवसाय पाहते. जून 1999 मध्ये त्यांना टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंटचे एमडी बनवण्यात आले. ही कंपनी मूळतः त्यांची आई सिमोन टाटा यांनी स्थापन केली होती.
ट्रेंटला मोठ्या उंचीवर नेण्याचे श्रेय नोएल टाटा यांना जाते. आज या कंपनीचे मार्केट कॅप 2,93,275.38 कोटी रुपये आहे. यामुळे टाटा समूहातील नोएल यांचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढली. 2003 मध्ये ते टायटन इंडस्ट्रीज आणि व्होल्टासच्या बोर्डात रुजू झाले.
2010 मध्ये त्यांची टाटा इंटरनॅशनलचे एमडी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर अशी अटकळ बांधली जात होती की, टाटा समूहाचे प्रमुख म्हणून रतन टाटा यांच्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल. पण 2011 मध्ये टाटा सन्सच्या बोर्डाने सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. सायरस मिस्त्री यांची बहीण आलू मिस्त्री हिचे लग्न नोएल टाटाशी झाले आहे.
या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले पण नोएल यांनी शांतपणे आपले काम चालू ठेवले. 2016 मध्ये मिस्त्री यांना चेअरमन पदावरून हटवण्यात आले आणि रतन टाटा काही काळासाठी अंतरिम चेअरमन म्हणून परतले. दरम्यान, एन चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे अध्यक्ष करण्यात आले.
नोएल यांची 2018 मध्ये सर रतन टाटा ट्रस्टच्या बोर्डावर नियुक्ती करण्यात आली होती. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना आता टाटा ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. मात्र ते टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत.
याचे कारण म्हणजे 2022 मध्ये टाटा सन्स बोर्डाने त्यांच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये एकमताने सुधारणा केली होती. त्यानुसार एकच व्यक्ती ही दोन्ही पदे भूषवू शकत नाही. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि टाटा सन्सचे अध्यक्षपद भूषवणारे रतन टाटा हे शेवटचे व्यक्ती होते. म्हणजेच नोएल टाटा हे टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत. यासाठी त्यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.
नोएल आणि आलू यांना तीन मुले आहेत - माया, नेव्हिल आणि लेआ. नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा 2016 मध्ये ट्रेंटमध्ये रुजू झाला आणि अलीकडेच स्टार बाजारचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये नोएल टाटा यांच्या मुलींचाही सहभाग आहे.
लेह टाटा यांना अलीकडेच इंडियन हॉटेल्सच्या गेटवे ब्रँडची जबाबदारी देण्यात आली होती. 36 वर्षीय माया टाटा यांना तंत्रज्ञानामध्ये रस आहे. त्या टाटा डिजिटलमध्ये काम करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार नोएल टाटांची एकूण संपत्ती 1.5 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 12,455 कोटी रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.