Nvidia company is now more valuable than Mark Zuckerberg's Meta Sakal
Personal Finance

Market Cap: एक अमेरिकन कंपनी सेन्सेक्सपेक्षा मोठी; गुगल आणि फेसबुकलाही टाकले मागे, 'इतके' आहे मार्केट कॅप

Nvidia Market Cap: ग्राफिक्स चिप बनवणारी कंपनी Nvidiaच्या शेअर्समध्ये तुफान तेजीत आहेत. गेल्या काही दिवसांत कंपनीने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता Nvidiaने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कंपनीचे मार्केट कॅपने 1.9 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे.

राहुल शेळके

Nvidia company Market Cap: ग्राफिक्स चिप बनवणारी कंपनी Nvidiaच्या शेअर्समध्ये तुफान तेजीत आहेत. गेल्या काही दिवसांत कंपनीने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता Nvidiaने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कंपनीचे मार्केट कॅपने 1.9 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे. भारतीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्सवर असलेल्या 30 कंपन्यांच्या एकत्रित मार्केट कॅपपेक्षा या कंपनीचे मार्केट कॅप जास्त आहे.

गेल्या वर्षी मेपर्यंत या कंपनीचे मार्केट कॅप सेन्सेक्सच्या निम्म्याहून कमी होते. आज त्याचे मार्केट कॅप 30 सेन्सेक्स कंपन्यांच्या एकत्रित मार्केट कॅपपेक्षा 30 टक्क्यांनी वर गेले आहे. ऑक्टोबर 2022 पासून आतापर्यंत कंपनीचे मार्केट कॅप 560 टक्क्यांनी वाढले ​​आहे.

भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, ज्याचे एकूण मूल्य सध्या 242 अब्ज डॉलर आहे. म्हणजेच Nvidia ने एका दिवसाच्या तेजीत संपूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य जोडले आहे.

गेल्या वर्षी मे मध्ये, कंपनी 1 ट्रिलियन डॉलरच्या बाजार मूल्यासह कंपन्यांच्या विशेष क्लबमध्ये सामील झाली. एवढेच नाही तर 1 वर्षाच्या आत 250 अब्ज डॉलर्सच्या वाढीसह मार्केट कॅपमध्ये सर्वात मोठ्या वाढीचा विक्रम कंपनीच्या नावावर आहे. (Nvidia company is now more valuable than Mark Zuckerberg's Meta)

एकूणच वॉल स्ट्रीटलाही Nvidia च्या या तेजीचा फायदा होत आहे. Nvidia प्रमुख अमेरिकन स्टॉक मार्केट S&P500 मध्ये सर्वोत्तम परफॉर्मर असल्याचे सिद्ध होत आहे. गेल्या वर्षी, Nvidia 36 टक्क्यांच्या वाढीसह S&P500 मध्ये अव्वल परफॉर्मर कंपनी होती.

S&P500 निर्देशांक या वर्षी म्हणजे 2024 मध्ये नवीन विक्रमी उच्चांक गाठण्यात यशस्वी झाला आहे, ज्यामध्ये Nvidia शेअर्सनी सर्वात प्रमुख भूमिका बजावली आहे.

कंपनीच्या महसुलात 265 टक्क्यांनी वाढ

Nvidia ने जानेवारीच्या चौथ्या तिमाहीत 22 बिलियन डॉलरची कमाई केली होती. मागील तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण 22 टक्के अधिक आहे. सर्व्हरसाठी चिपची मागणी वाढल्याने कंपनीचा महसूल वाढला आहे.

बाजार विश्लेषक देखील Nvidia चे रेटिंग वाढवण्यास उत्सुक दिसत आहेत. मॉर्गन स्टॅनलीने आता त्याची 12 महिन्यांची लक्ष्य किंमत 750 डॉलर वरून 795 डॉलर पर्यंत वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT