Ola Cabs IPO  Sakal
Personal Finance

Ola Cabs IPO : ओला कॅब्सचा आयपीओही येणार, इन्वेस्टमेंट बँकांसोबत चर्चा सुरु...

ओला कॅब्स (Ola Cabs) लवकरच आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. याबाबत चर्चाही सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ola Cabs IPO : ओला कॅब्स (Ola Cabs) लवकरच आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. याबाबत चर्चाही सुरू झाली आहे. ओला कॅब्सची मूळ कंपनी एएनआय टेक्नॉलॉजीजने या आठवड्यात इन्वेस्टमेंट बँकांसोबत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. कंपनी आपल्या आयपीओच्या संभाव्य लॉन्चसाठी कंपनीचे व्हॅल्यूएशन करत आहे.

ओला इलेक्ट्रिकने डिसेंबरमध्ये बाजार नियामक सेबीकडे आयपीओद्वारे सुमारे 7,250 कोटी उभारण्यासाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला होता, जो भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) फर्मद्वारे सार्वजनिक लिस्टिंग करण्याचा पहिला प्रयत्न आहे. ओला कॅबची स्थापना 2010 मध्ये झाली होती.

ओला कॅब्सने 19 एप्रिला बेंगळुरूमध्ये काही जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूक बँकांशी सुरुवातीच्या टप्प्यात चर्चा केली. नंतर इतर बँकांसोबत आणखी बैठका होऊ शकतात. तथापि, अद्याप लिस्टिंगबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही आणि बाजाराच्या परिस्थितीनुसार योजना नंतर बदलू शकतात.

ओला इलेक्ट्रिक आणि ओला कॅब दोन्ही स्वतंत्र व्यवसाय आहेत आणि दोन्ही आयपीओसाठी पात्र आहेत. जर कंपनीने ठरवले तर ते सल्लागारांचे सिंडिकेट तयार करतील आणि पुढे जातील. ओला कॅब्सची भारतातील उबेरशी स्पर्धा आहे. कंपनीने तिची तीनचाकी आणि चारचाकी सेवांचे इलेक्ट्रिफाय करण्याची आणि ईव्ही दुचाकी सेवांचा विस्तार करण्याची योजना आखली आहे, ज्यासाठी कंपनी स्थानिक भागीदारींचे व्हॅल्यूएशन करेल असे कंपनीचे सीईओ हेमंत बक्षी यांनी जानेवारीत सांगितले होते.

ओलाच्या मोबिलिटी बिझनेसने आर्थिक वर्ष 2023 मध्ये महसुलात जवळपास 58 टक्के वाढ नोंदवून 2,135 कोटी नोंदवले आणि कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 66 कोटी रुपयांचा EBITDA तोटा नोंदवल्यानंतर प्रथमच 250 कोटीचा पॉझिटिव्ह EBITDA नोंदवला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT