Ola Electric: ओलाचे सह-संस्थापक आणि सीईओ यांनी अलीकडेच ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटमध्ये एक महत्त्वाची माहिती दिली. भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात त्यांचे नवीन ईव्ही उत्पादन युनिट लवकरच सुरू होणार आहे.
हे युनिट पूर्ण झाल्यानंतर 25 हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. भाविश यांनी शिखर परिषदेत सांगितले की, उत्पादन क्षमतेव्यतिरिक्त, 2000 एकरमध्ये असलेल्या या ईव्ही हबमध्ये विक्रेता आणि पुरवठादार यांची साखळी देखील असेल. भाविश यांनी ईव्हीचे जागतिक केंद्र बनवण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
आठ महिन्यांत भारतात दुचाकी उत्पादन सुविधा उभारण्यात यश मिळाल्याची माहितीही भाविश यांनी दिली. पुढील महिन्यापासून याचे उत्पादनही सुरू होणार आहे. हा संपूर्ण कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. दरवर्षी 1 कोटी दुचाकी येथे तयार केल्या जातील.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, ओला इलेक्ट्रिकने तमिळनाडूमध्ये 7,000 कोटींची गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला होता.
चेन्नई ट्रेड सेंटर येथे तामिळनाडू GIM (Global Investors Meet) चे उद्घाटन करण्यात आले. 7 आणि 8 जानेवारी असे दोन दिवस GIM होणार आहे. ओला इलेक्ट्रिक सध्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर श्रेणीतील मार्केट लीडर म्हणून उदयास आली आहे, नोव्हेंबरपर्यंत कंपनीचा बाजारातील हिस्सा सुमारे 32% होता. वाहन डेटानुसार, कंपनीने सुमारे 30,000 वाहनांची विक्री केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.