Paris Olympics 2024 SaKAL
Personal Finance

Olympics 2024: ऑलिम्पिक विजेते होणार मालामाल! खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ, सर्वात आवडता स्टार कोण?

राहुल शेळके

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने 6 पदके जिंकण्यात यश मिळवले असले तरी यावेळी भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यामुळे भविष्यात मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत मनू भाकर, सरबज्योत सिंग, स्वप्नील कुशाळे, भारतीय हॉकी संघ, नीरज चोप्रा आणि अमन सेहरावत यांनी भारताला पदक जिंकून देण्यात यश मिळवले आहे.

यावेळी भारताला नेमबाजीत तीन पदके मिळाली आहेत. त्याचबरोबर नीरजने भालाफेकमध्ये भारतासाठी पदक मिळवले आहे. कांस्यपदक जिंकण्यातही भारतीय हॉकी संघाला यश आले आहे. भारताने आतापर्यंत 5 कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण मिळाले नाही.

ऑलिम्पिकनंतर खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ

पॅरिस ऑलिम्पिकनंतर अनेक खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑलिम्पिक वीरांच्या यशाचे भांडवल करण्यास भारतीय कंपन्या उत्सुक दिसत आहेत.

स्पोर्ट्स मॅनेजमेंट फर्म मेडलाइन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटचे सह-संस्थापक वरुण चोप्रा म्हणतात, पॅरिस ऑलिम्पिकने भारतीय क्रीडा क्षेत्रात नवीन हिरो समोर आणले आहेत.

यासोबतच नवीन शक्यतांची दारेही उघडली आहेत. मनू भाकर, नीरज, सेन आणि हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यांचा उल्लेख करून ते म्हणाले की यांच्यावर बायोपिक चित्रपट तयार केला जाऊ शकतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी बिझनेस स्टँडर्डला दिली आहे.

चोप्राला भालाफेकमध्ये पुन्हा सुवर्णपदक जिंकता आले नसले तरी ब्रँड तज्ञांचा अजूनही त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूवर विश्वास आहे. नवी दिल्लीतील ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट शगुन गुप्ता म्हणाले की, त्यांची ब्रँड व्हॅल्यू त्यांच्या विजयापेक्षा खूप जास्त आहे.

हरमनप्रीत सिंग कंपन्यांचा सर्वात आवडता स्टार

हॉकी संघाचा कर्णधार आणि या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा हरमनप्रीत सिंग हा ब्रँडिंगसाठी कंपन्यांचा सर्वात आवडता स्टार म्हणून उदयास आला आहे, कारण या हॉकी संघाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे.

कुस्तीपटू विनेश फोगट कदाचित फायनल खेळू शकली नसेल, परंतु तिच्या धाडसी ऑलिम्पिक प्रवासाची अनेक ब्रँड्सनी गांभीर्याने दखल घेतली आहे.

ब्रँड्स स्ट्रॅटेजिस्ट गुप्ता म्हणतात, ती निःसंशयपणे टॉक ऑफ द टाऊन बनली आहे. कंपन्या तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की ती या ऑलिम्पिकमधील सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन संपन्न

Dhule Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट! धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू; सहा जण जखमी

Phullwanti : "असा मिळाला गश्मीरला नरसिंह शास्त्रींचा रोल" ; प्राजक्ता-गश्मीरने केला खुलासा

Yuvraj Singh: धोनी, विराट, रोहित नाही, तर युवीला त्याच्या ड्रीम टीममध्ये पाहिजे हे तीन खेळाडू

Vladimir Putin: ''लंच ब्रेकमध्येही करा सेक्स..'' पुतीन यांनी देशातील तरुणांना का केलं आवाहन?

SCROLL FOR NEXT