on the eve of ayodhya ram mandir inauguration newly register with sebi company investment opportunity money management risk reward  Sakal
Personal Finance

आर्थिक संधींची अयोध्यानगरी

तीन-चार वर्षांपूर्वीची कोविडची महासाथ सर्व जगालाच शापदायक ठरली. भारतही त्याला अपवाद नव्हता. परंतु, असे म्हणतात की, कोणतेही संकट अस्त पावताना एक संधी किंवा चांगले दिवस देऊन जाते. भारतात तेच घडते आहे.

गोपाळ गलगली

तीन-चार वर्षांपूर्वीची कोविडची महासाथ सर्व जगालाच शापदायक ठरली. भारतही त्याला अपवाद नव्हता. परंतु, असे म्हणतात की, कोणतेही संकट अस्त पावताना एक संधी किंवा चांगले दिवस देऊन जाते. भारतात तेच घडते आहे.

मध्यंतरी विविध क्षेत्रांत पीछेहाट झालेला भारत आता अनेक संधींच्या प्रांगणात उतरला आहे. यांपैकी अयोध्येतील रामजन्मभूमीचा नव्याने होत असलेला उदय ही एक मोठी आर्थिक संधी भारतात येऊ घातली आहे. याचा प्रत्यय आपल्याला येत आहे. अयोध्यानगरीची कवाडे विविध आर्थिक सुधारणांसाठी उघडली आहेत.

उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली ‘अयोध्या डेव्हलपमेंट ॲथॉरिटी’ जोमाने कामाला लागली आहे. अयोध्यानगरीला जगातील व्हॅटिकन सिटी, मक्का किंवा जेरूसलेमच्या तोडीला आणून ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

यानिमित्ताने या नगरीच्या सुधारणा वेगाने होत आहेत. त्यात रस्ते, रेल्वे, विमानतळ, बससेवा, टॅक्सीसेवा, पेट्रोल पंप, तारांकीत हॉटेल, विविध बँका, बाजारपेठ, रुग्णालये, कुरियरसेवा आदींचा समावेश आहे. या किंवा इतर सेवा किंवा उत्पादक कंपन्यांना अयोध्यानगरी साद घालत आहे. शेअर बाजारामध्ये नोंदणी झालेल्या अनेक कंपन्यांना तेथे मोठा वाव आहे.

याशिवाय पुढील देशी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सरसावून कामाला लागल्या आहेत- ओयो हॉटेल्स, अपोलो सिंदूर हॉटेल्स, जेनेसिस इंटरनॅशनल, जिंजर, पार्क-इन रॅडिसन, रामदा हॉटेल आदी. या शिवाय शरयू नदीवरील जलमार्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

अयोध्येतील विमानतळाला ॠषी वाल्मिकी विमानतळ नावाने ओळखले जाणार आहे. वार्षिक १० लाख प्रवासी आणि रु. १४५० कोटी खर्चून बांधलेल्या या विमानतळावरून अनेक चार्टर्ड विमाने हजारो श्रीमंतांना अयोध्येत घेऊन येणार आहेत. त्यानिमित्ताने पैशाचा ओघ सुरू होईल, आर्थिक उलाढाली वाढून बाजारपेठेला बळ मिळेल, लाखो रोजगार निर्माण होतील. रेल्वे, बस, रिक्षा, मोटारी आदी मार्गाने येणाऱ्या रामभक्तांमुळे अयोध्येचे आणि पर्यायाने भारताचे नाव जगभर होणार आहे.

काही लक्षवेधक नोंदणीकृत कंपन्या

अयोध्येशी निगडित असलेल्या पुढील कंपन्यांचे काम जोरात सुरू आहे...

  • प्राव्हेग: ही प्रवासी कंपनी प्रवासाच्या सोयी उपलब्ध करून देते. मुख्यत: ऐषोरामी तंबू हॉटेलसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. प्रतिदिनी रु. ८००० पर्यंत वातानुकूलित तंबूचे दर आहेत. भारतात इतर देवस्थानांच्या शहरात देखील ही सेवा उपलब्ध आहे.

  • आयआरसीटीसी: रेल्वे रिझर्व्हेशन आणि खाद्यसेवा क्षेत्रातील या कंपनीचे जाळे भारतभर पसरलेले आहे.

  • आयटीडीसी: भारत सरकारची प्रवासी सेवा देणारी कंपनी आहे.

  • थॉमस कुक: सर्वांत जुनी प्रवासी सेवा कंपनी. अयोध्या सहलीची योजना तयार करते.

  • इंडियन हॉटेल्सः ही टाटा ग्रुपची कंपनी ५२० खोल्यांचे हॉटेल बांधत आहे.

  • इंडिगो: विमान सेवा देणारी सर्वांत मोठी कंपनी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT