नवी दिल्ली:ऑनलाइन गेमिंगवरील करआकारणीसह विविध मुद्द्यांवर शनिवारी (ता. २३) होणाऱ्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. दूरसंचार कंपन्यांच्या स्पेक्ट्रम शुल्कावर ‘जीएसटी’ लागू करण्याबाबतही चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.
‘जीएसटी’ परिषदेची ५३ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली येत्या शनिवारी, २३ जून रोजी होणार आहे. त्यात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री सहभागी होणार आहेत. ही बैठक तब्बल आठ महिन्यांच्या खंडानंतर होत आहे. याआधी सात ऑक्टोबर २०२३ रोजी परिषदेची बैठक झाली होती.
‘जीएसटी’ परिषदेने एक ऑक्टोबर २०२३ रोजी ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि अश्व शर्यतीवरील जुगारावर २८ टक्के ‘जीएसटी’ आकारणीचा निर्णय घेतला होता. यानंतर ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील ७० कंपन्यांना एकूण १.१२ लाख कोटींच्या करचुकवेगिरी प्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्या. यातील अनेक कंपन्यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यावेळी सहा महिन्यांनी या कराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता या बैठकीत कराच्या दराबाबत कोणताही फेरविचार होणे अपेक्षित नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना बजावललेल्या नोटिसांची कायदेशीर वैधता व पुढील कार्यवाही यावर बैठकीत चर्चा होईल, असेही सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.