Online Gaming GST Delta Corp eSakal
Personal Finance

Online Gaming GST : डेल्टा कॉर्पला जीएसटीची आणखी एक नोटीस; द्यावे लागणार आणखी 6,385 कोटी!

Delta Corp : यानंतर कंपनीला द्याव्या लागणाऱ्या कराची एकूण रक्कम 23,206 कोटी रुपये झाली आहे.

Sudesh

कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंग कंपनी चालवणाऱ्या डेल्टा कॉर्पला जीएसटी विभागाने आणखी एक दणका दिला आहे. अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या नोटीसनुसार, डेल्टाटेक गेमिंगला कर म्हणून तब्बल 6,385 कोटी द्यावे लागणार आहेत. यानंतर कंपनीला द्याव्या लागणाऱ्या कराची एकूण रक्कम 23,206 कोटी रुपये झाली आहे.

डेल्टाटेक गेमिंगला गॉसियन नेटवर्क्स म्हणूनही ओळखलं जातं. ही कंपनी Adda52 आणि Addagames असे गेमिंग अ‍ॅप्स चालवते. या कंपनीला आतापर्यंतचा कर, त्यावरील व्याज आणि दंड अशी एकूण रक्कम जमा करण्यास सांगितली आहे. अन्यथा, सीजीएसटी कायद्याअंतर्गत कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येईल.

कंपनी विकूनही जमणार नाही पैसा

डेल्टा कॉर्प या संपूर्ण कंपनीची मार्केट कॅप ही 3,749 कोटी रुपये आहे. तर टॅक्स शॉर्टफॉल रक्कम आणि दंड मिळून कंपनीला तब्बल 23,206 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम कंपनीच्या मूल्यापेक्षा सुमारे सात पटींनी अधिक आहे.

इतर कंपन्यांनाही नोटीस

डेल्टा कॉर्पसोबतच कॅसिलो डेल्टिन डेनजोंग, हायस्ट्रीट क्रूज आणि प्लेजर क्रूज अशा तीन सहाय्यक कंपन्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. या कंपन्यांकडून एकूण 5,682 कोटी रुपये वसूल करण्यात येणार आहेत.

यासोबत ड्रीम 11 बनवणाऱ्या ड्रीम स्पोर्ट्स कंपनीला 25,000 कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. तर, गेम्सक्राफ्ट कंपनीला 21,000 कोटी आणि प्ले गेम्स 24x7 या कंपनीला 20,000 कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे.

या सर्व कंपन्यांकडून ग्रॉस बेट व्हॅल्यूवर कर आकारण्यात येतो आहे. त्यामुळेच कराची एकूण रक्कम तब्बल 1 ट्रिलियन रुपयांहून अधिक होत आहे. 2017 ते 2022 या कालावधीमध्ये झालेल्या ग्रॉस बेट व्हॅल्यूवरील हा कर आहे. या सर्व कंपन्यांचं याच कालावधीतील कलेक्शन रेव्हेन्यूच केवळ 20,929 कोटी रुपये आहे. त्यामुळे कर आणि दंडाची रक्कम आपण कंपन्या विकून देखील भरू शकत नसल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे.

काय आहे वाद?

गेमिंग कंपन्या आतापर्यंत प्लॅटफॉर्म फीवर 18 टक्के जीएसटी भरत आआल्या आहेत. प्लॅटफॉर्म फी म्हणजे एखादी कंपनी गेम खेळण्यासाठी खेळाडूंकडून घेत असलेले कमिशन. मात्र, सरकारने असं म्हटलं आहे की जीएसटी दर हा कायम फुल फेस व्हॅल्यूवर होता, आणि तो 28 टक्के होता. त्यामुळे या सर्व कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT