OTT streaming growth slows after Corona what are the reasons for the slowdown  Sakal
Personal Finance

OTT Platform: कोरोनानंतर आलेलं ओटीटीचं वादळ हळूहळू होतंय शांत, काय आहेत मंदावण्याची कारणे?

OTT Platform: लॉकडाऊनमध्ये मनोरंजन क्षेत्रातील OTT प्लॅटफॉर्मला सर्वाधिक फायदा झाला.

राहुल शेळके

OTT Platform: कोरोना काळात लॉकडाऊनमुळे लोकांच्या जीवनमान अमुलाग्र बदलले. या काळात उद्योगधंदे बंद पडल्याने लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमध्ये मनोरंजन क्षेत्रातील OTT प्लॅटफॉर्मला सर्वाधिक फायदा झाला.

कोरोनामुळे देशभरातील चित्रपटगृहे एका वर्षाहून अधिक काळ बंद होती. अशा परिस्थितीत ओटीटी हे लोकांसाठी मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन म्हणून उदयास आले. आज, अनेक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करत आहेत.

तर अनेक दिग्गज चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत, कारण कोरोनानंतर चित्रपटगृहांकडे जाणारा प्रेक्षक कमी झाला आहे. अशा परिस्थितीत, ओटीटी प्लॅटफॉर्मला त्यांची व्याप्ती वाढवण्याची चांगली संधी मिळाली. याचा चित्रपटगृहांवर निश्चितच परिणाम झाला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मचे एकूण प्रेक्षक 13.5% वाढून 2023 मध्ये 481.1 दशलक्ष पर्यंत पोहोचले आहेत. 2022 मध्ये त्यांची संख्या 423.8 दशलक्ष होती असे मीडिया सल्लागार फर्म Ormax चे मत आहे. स्ट्रीमिंग अॅप्स आता भारताच्या 1.4 अब्ज लोकसंख्येच्या 34% पर्यंत पोहोचले आहेत. असे वृत्त Livemint ने दिले आहे.

कोरोनानंतर ओटीटी वाढीचा दर कमी झाला आहे. कोरोनामध्ये ओटीटीमध्ये मोठी वाढ झाली होती पण ती आता ओसरली आहे. डेटाची किंमत आणि डिजिटल माध्यमांची वाढ यासारख्या घटकांमुळे ही वाढ कमी झाली आहे. असे Ormax Mediaचे शैलेश कपूर यांचे मत आहे.

विशेषत: ग्रामीण भागात आणि लहान शहरांमधील वाढीचा दर कमी आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर आता टॉप 20 शहरांच्या पलीकडे वाढू शकतो का हे मोठे आव्हान आहे, असे शैलेश कपूर म्हणाले.

जगात 16%, किंवा 77.2 दशलक्ष लोक अप्रत्यक्ष ग्राहक आहेत; याचा अर्थ ते या प्लॅटफॉर्मवर कंटेट पाहतात पण त्यांनी स्वत: कोणतेही सबस्क्रीपशन घेतलेले नाही आणि ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे किंवा मित्रांचे सबस्क्रीपशन वापरून ओटीटीचा वापर करतात. सुमारे 8.2%, किंवा 39.5 दशलक्ष लोकांनी सबस्क्रीपशन घेतलेले आहे.

जगात सुमारे 27%, किंवा 129.9 दशलक्ष लोक फक्त YouTube आणि/किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहतात. 2023 हे वर्ष आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) आणि आता विश्वचषक यासह क्रीडा कंटेट विनामूल्य उपलब्ध करुन दिला जात आहे. याचा परिणाम ओटीटीच्या वाढीवर होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT