Padma Shri awardee Sundar Menon Sakal
Personal Finance

Sun Group: '7 कोटी रुपये, 18 खटले, 62 जण...', पद्मश्री उद्योजक सुंदर मेनन यांना अटक; मोठे कारण आले समोर

Sun Group International: पद्मश्री पुरस्कार विजेते सुंदर मेनन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुंतवणुकदारांची 7 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. केरळमधील त्रिशूर येथील न्यायालयाने सुंदर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राहुल शेळके

Sundar Menon: पद्मश्री पुरस्कार विजेते सुंदर मेनन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुंतवणुकदारांची 7 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. केरळमधील त्रिशूर येथील न्यायालयाने सुंदर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ते सन ग्रुप इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि त्रिशूरमधील तिरुवाम्बडी देवस्वोम (मंदिर) बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेनन यांच्यावर 18 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी लोकांना दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. हिवन निधी लिमिटेड आणि हिवन फायनान्स या दोन कंपन्या आहेत. मेनन हे त्यांचे डायरेक्टर होते.

त्रिशूर शहराचे पोलिस आयुक्त आर. इलांगो म्हणाले की, सुंदर मेनन यांनी या योजनेत गुंतवणूकदारांनी जमा केलेले पैसे मुदतपूर्तीनंतरही परत केले नाहीत. त्याऐवजी त्यांनी पैसे वळवल्याचा आरोप आहे. या कथित फसवणुकीत 62 जणांकडून एकूण 7.87 कोटी रुपये वसूल करण्यात आले.

सुंदर मेनन यांच्यासह अन्य कंपन्यांच्या संचालकांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. या प्रकरणात आणखी एक डायरेक्टर पुथेनवीट्टिल बिजू मणिकंदन याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. शहर पोलिसांच्या 'भ्रष्टाचाऱ्यांच्या यादीत' बिजूचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

सुंदर मेनन यांना 2016 मध्ये सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एनआरआय उद्योगपती सुंदर मेनन यांना यापूर्वीही अशा प्रकरणांचा सामना करावा लागला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सप्टेंबर 2023मध्ये केरळ उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

यामध्ये मेनन यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्ते त्रिशूरचे व्हीआर ज्योतिष आणि कोझिकोडचे सीके पद्मनाभन होते. मेनन हे एकापेक्षा जास्त गुन्हेगारी प्रकरणात गुंतल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. त्यात जनहिताशी संबंधित काहीही आढळले नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.

मेनन हे अनेक धर्मादाय संस्थांशी संबंधित आहेत. यामध्ये सन चॅरिटेबल ट्रस्ट, पेन अँड पॅलिएटिव्ह केअर सोसायटी, ऑटिझम सोसायटी, अल्फा पेन क्लिनिक, ऑल इंडिया हँडिकॅप्ड असोसिएशन आणि रेनल अँड किडनी वेल्फेअर फाऊंडेशन यांचा समावेश आहे.

2015 मध्ये त्यांनी अमेरिकेतील युरोपियन कॉन्टिनेंटल कम्युनिटी युनिव्हर्सिटी (यूएसए) कडून मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्यांना एशिया पॅसिफिक उद्योजकता पुरस्कार, 2015 ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT