Paytm Cashback Offer: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. पेटीएमने त्यांच्यासाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अयोध्येतील राम मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांना बस आणि फ्लाइट बुकिंगवर 100 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.
Paytm वर 100 टक्के कॅशबॅक कसा मिळवायचा?
अयोध्येला जाणारे भाविक बस बुकिंगसाठी प्रोमो कोड 'BUSAYODHYA' वापरू शकतात. त्याचप्रमाणे फ्लाइट बुकिंगसाठी 'FLYAYODHYA' चा वापर करता येईल. कंपनीचा दावा आहे की प्रत्येक दहावा युजर या कॅशबॅक ऑफरसाठी पात्र असणार आहे.
या योजनेअंतर्गत बस प्रवाशांना 1,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. तर फ्लाइट तिकीट बुक करणाऱ्यांना 5,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक जिंकण्याची संधी आहे.
तुम्हाला अयोध्येची यात्रा रद्द करायची असेल तर काळजी करू नका! पेटीएमच्या 'फ्री कॅन्सलेशन' सुविधेसह, तुम्ही तुमच्या बँक खात्यात 100% पैसे परत मिळवू शकता. एवढेच नाही तर पेटीएम लाइव्ह बस ट्रॅकिंग सेवा देखील देत आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बुक केलेल्या बसचे रिअल-टाइम लोकेशन तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसोबत शेअर करू शकता.
पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी ही विशेष ऑफर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. बस आणि फ्लाइट बुकिंगवर 100% कॅशबॅकसह अयोध्येचा प्रवास सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करण्याचे आमचे ध्येय आहे.'
पेटीएमच्या मदतीने राम मंदिर ट्रस्टला देणगी देता येणार
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला आता पेटीएम ॲपवरून देणगी दिली जाऊ शकते. ही सुविधा पेटीएम ॲपवर राम मंदिर सोहळ्याच्या दिवशी सुरू झाली, ज्याद्वारे भाविक आता डिजिटल पद्धतीने दान करू शकतात. पेटीएम ॲपच्या 'भक्ती' सेक्शनमधून भारतभरातील भाविक देणगी देऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.