Paytm E-commerce rebrands to Pai Platforms, check details here  Sakal
Personal Finance

Paytm: पेटीएमने बदलले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे नाव; काय आहे कारण?

राहुल शेळके

Paytm E-commerce Platforms New Name: पेटीएम ई-कॉमर्सने आपले नाव बदलून पाई प्लॅटफॉर्म केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने सुमारे तीन महिन्यांपूर्वी नाव बदलण्यासाठी अर्ज केला होता, त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या रजिस्ट्रारकडून मंजुरी मिळाली.

पेटीएम ई-कॉमर्समधील एलिव्हेशन कॅपिटल ही सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे. याला पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा, सॉफ्टबँक आणि ईबे यांचाही या निर्णयाला पाठिंबा आहे. अहवालानुसार, कंपनीने आता इनोबिट्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (बिटसिला) विकत घेतले आहे. ही कंपनी 2020 मध्ये लाँच झाली होती.

पेमेंट्स बँकेवर कारवाई

कंपनी हे अधिग्रहण अशा वेळी करत आहे जेव्हा अलीकडेच तिच्या बँकिंग युनिटवर कारवाई करण्यात आली आहे आणि रिझर्व्ह बँकेने त्यावर बंदी घातली आहे. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन युजर जोडण्यास आणि क्रेडिट व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत होईल

या प्रस्तावित डीलमुळे पेटीएमला त्याचा ई-कॉमर्स व्यवसाय वाढविण्यात खूप मदत होईल. याशिवाय पेटीएम ONDC वर देखील सेवा देत आहे. पेटीएम 2022 पासून ONDC वर सक्रिय आहे. सरकारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेवा देणाऱ्या मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.

पेटीएम वर आरबीआयचे मत

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, कोणत्याही बँक किंवा कंपनीवर कारवाई करण्यापूर्वी आम्ही कंपनीला सुधारणा करण्यासाठी पुरेसा वेळ देतो. परंतु पेटीएमने सतत आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आणि कोणतीही सुधारणा केली नाही. आरबीआयने ही कारवाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT