नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट बँकेनं फॉरेन एक्स्चेंज नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानंतर युपीआय क्षेत्रासह शेअर मार्केटमध्येही मोठी पडझड झाली होती. यापार्श्वभूमीवर आता पेटीएमची पॅरेंट कंपनी वन ९७ कम्युनिकेशन एक पत्रक काढत स्पष्टीकरण दिलं आहे.
वन ९७ कम्युनिकेशननं तसेच आमच्या सहकारी पेटीएम पेमेंट्स बँक लि.नं फॉरेन एक्स्चेंज नियमांचं कुठलंही उल्लंघन केलेलं नाही, असा दावा केला आहे. (paytm issues statement we deny reports of investigation or violation of foreign exchange rules)
पेटीएममनं या प्रसिद्धी पत्रकातून म्हटलं की, नुकत्याच समोर आलेल्या दिशाभूल करणारी माहितीबाबत, तथ्यांमधील चुका आणि अफवांबाबत 'वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेड'ला कंपनीची स्थिती तसेच माध्यमांमधून कंपनीबाबत पसरलेल्या चुकीच्या बातम्यांमधील अफवांबाबत थेटपणे स्पष्टीकरण देत आहोत. (Latest Marathi News)
या अफवांच्या बातम्यांमुळं आमचे ज्या ग्राहकांमध्ये, शेअर होल्डर्समध्ये आणि स्टेक होल्डर्समध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्यात पारदर्शकता टिकावी, कंपनीचा सन्मान कायम राहावा यासाठी आम्ही वेळोवेळी याबाबत स्पष्टीकरण देत राहणार आहोत. कंपनीनं कालच एक विशेष स्पष्टीकरण दिलं होतं. ज्यामध्ये ईडीकडून ओसीएल, पेटीएम पेमेंट बँक आणि आमच्या मॅनेजमेंटची कुठलीही चौकशी सुरु नसल्याचं स्पष्ट केलं होतं. (Marathi Tajya Batmya)
काही माध्यमांतील रिपोर्टमध्ये कंपनीच्या चौकशीबाबत तथ्यहीन अफवा पसरवण्यात आल्या होत्या. पण आम्ही स्पष्ट करु इच्छितो की, कंपनी आणि आमची सहकारी पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडची फॉरेन एक्स्चेंज नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कुठलीही चौकशी सुरु नाही. या बातम्या पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या, तथ्यहीन आणि संशयास्पद आहेत जे आमच्या स्टेकहोल्डर्ससाठी धोकादायक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.