Paytm Shares  eSakal
Personal Finance

Paytm : पेटीएमच्या शेअर्समध्ये पुन्हा घसरण, ऑल-टाइम लो वर शेअर...

सकाळ वृत्तसेवा

Paytm : पेटीएमचे (Paytm) शेअर्स सध्या अतिशय खराब कामगिरी करत आहेत. बुधवारी अर्थात 8 मे रोजी 5 ते टक्क्यांनी घसरले आणि 317.15 रुपयांच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण एका अहवालानंतर आली आहे.

या अहवालात आदित्य बिर्ला फायनान्ससह तिच्या अनेक लेंडिंग पार्टनर्सने दिलेली कर्ज हमी रोखून धरली असावी असे म्हटले आहे. पेटीएमचे शेअर्स गेल्या 3 दिवसात 14% पेक्षा जास्त घसरले आहेत. त्याच वेळी, पेटीएमचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत सुमारे 50 टक्क्यांनी घसरले आहेत.

आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवसायावर बंदी घातल्यानंतर, आदित्य बिर्ला फायनान्स व्यतिरिक्त, पिरामल फायनान्स आणि क्लिक्स कॅपिटल सारख्या इतर लेंडर्सनीही पेटीएम बरोबरची भागीदारी थांबवल्याचे अहवालात म्हटले आहे.

एप्रिलमध्ये, पेटीएमच्या प्लॅटफॉर्मद्वारे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारांमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घट झाली. एप्रिलमध्ये कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून 111.73 कोटी व्यवहार झाले, जे मागील महिन्यातील 123.04 कोटी व्यवहारांपेक्षा सुमारे 9 टक्के कमी आहे.

UPI च्या बाबतीत, कंपनीचा बाजार हिस्सा एप्रिलमध्ये 8.4 टक्क्यांवर घसरला, जो पूर्वी फेब्रुवारीमध्ये 10.8 टक्के आणि मार्चमध्ये 9.13 टक्के होता.

पेटीएमचा निव्वळ तोटा आर्थिक वर्ष 2024 च्या मार्च तिमाहीत 470 कोटीपर्यंत वाढू शकतो, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 170 कोटी होता असे मोतीलाल ओसवालच्या विश्लेषकांचे म्हणणे आहे.

त्याच वेळी कंपनीचा महसूल 22.5 टक्क्यांनी घसरून 1,830 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 2,340 कोटी होता असेही त्यांचे म्हणणे आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या बंदीमुळे आम्हाला ऑपरेटिंग नफ्यात (EBITDA) घट होण्याची शक्यता वाटत असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे, त्यामुळे त्यांनी पेटीएम स्टॉकला 475 रुपयांच्या टारगेटसह 'तटस्थ' रेटिंग दिले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT