Pensioners have to submit life certificate by November 30, 2023 Check details here  Sakal
Personal Finance

Life Certificate: पेन्शनधारकांनी आजच 'हे' महत्त्वाचे काम पूर्ण करा अन्यथा पेन्शन होईल बंद

Jeevan Pramaan Patra Deadline: पेन्शन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

राहुल शेळके

Jeevan Pramaan Patra Deadline: सरकारकडून पेन्शन घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हाला तुमची पेन्शन वेळेवर हवी असेल, तर तुम्ही 30 नोव्हेंबरपूर्वी एक काम पूर्ण केले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर यानंतर तुमचे पेन्शन येणे बंद होईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व निवृत्ती वेतनधारकांनी हे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

60 वर्षे ते 80 वर्षे वयोगटातील प्रत्येक निवृत्तीवेतनधारकाला 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान त्याचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते, जे तुमच्या हयात असल्याचा पुरावा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे तुम्हाला पेन्शन मिळू शकते. 80 वर्षांच्या पेन्शनधारकास 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान हे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

30 नोव्हेंबरनंतर जीवन प्रमाण सादर करता येईल का?

जर तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र 30 नोव्हेंबरपर्यंत सादर केले नाही तर तुमचे पेन्शन थांबवले जाऊ शकते, कारण त्याशिवाय तुम्हाला पेन्शनची रक्कम मिळणार नाही. परंतु तुमच्याकडे एक पर्याय आहे, तो म्हणजे, तुम्ही पुढच्या वर्षी 31 ऑक्टोबरपूर्वी तुमचे प्रमाणपत्र सादर केल्यास, तुमचे पेन्शन पुन्हा सुरू होईल, आणि अद्याप मिळालेली शिल्लक रक्कमही तुम्हाला दिली जाईल.

जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे?

देशातील पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र 5 प्रकारे सादर करण्याची सुविधा मिळते. ते पेन्शनधारक जीवन प्रमाण पोर्टलद्वारे, फेस ऑथेंटिकेशनद्वारे, पोस्ट पेमेंट बँकेद्वारे, नियुक्त अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीद्वारे आणि डोअर स्टेप बँकिंगद्वारे जमा करू शकतात.

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे मार्ग:

1. पेन्शनधारक वैयक्तिकरित्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

2. फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करा

3. उमंग अॅपद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करा

4. डोअर स्टेप बँकिंगच्या मदतीने तुम्ही हे काम करु शकता

5. जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी जीवन प्रमाण पोर्टलची मदत घ्या.

6. भारतीय पोस्टाच्या पोस्टमन सेवेद्वारे देखील जीवन प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT