Per Capita Income Maharashtra Esakal
Personal Finance

Per Capita Income: गुजरातने टाकले महाराष्ट्राला मागे, दरडोई उत्पन्नात घेतली आघाडी

Financial Audit Report Maharashtra: या आकडेवारीमुळे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला विधी मंडळाच्या अधिवेशनाच्या सुरूवातील आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयतं कोलीत मिळाले आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवल्याचे आरोप सत्ताधारी भाजपवर विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. अशात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अर्थिक पाहणी आहवालात दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर गुजरातने पाचवे स्थान पटकावले आहे.

या आकडेवारीमुळे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला विधी मंडळाच्या अधिवेशनाच्या सुरूवातील आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयतं कोलीत मिळाले आहे.

महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवल्याचा मुद्दा जनतेसमोर मांडत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारला चांगलेच घेरले होते.

आता नव्या अर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात गुजरातच्या मागे पडल्याने अधिवेशनाच्या दरम्यान विधी मंडळात आणि विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे.

आमदार जितेंद्र आव्हाडांची एक्स पोस्ट

यंदाच्या अर्थिक पाहणी आहवालाची आकडेवारी समोर आल्यानंतर माजी मंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संघर्षातून राज्याला मदतीचा हात देत वृद्धिदर उंचावला होता; तोच आता महायुती सरकार कमी करत आहे. या सगळ्यात राज्याचं नुकसान तेवढं होतंय. महाराष्ट्र राज्य आर्थिक सर्वेक्षण, २०२३-२४ नुकताच प्रकाशित झाला. त्यानुसार, दरडोई उत्पन्नात देखील राज्य आता ६ व्या क्रमांकावर आले आहे. राज्यात नवीन उद्योग आणणं सोडा, पण असलेले उद्योग सुद्धा दुसऱ्या राज्यात पाठवून रोजगार कमी करण्यास सरकारने हातभारच लावलाय. राज्याला केवळ संकटात टाकण्याचं काम हे सरकार करतंय."

जयंत पाटलांची टीका

दरम्यान अनेक वर्षे राज्याचे अर्थमंत्रीपद सांभाळण्याचा अनुभव असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर महायुती सरकारला धारेवर धरले आहे.

जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, "आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र या अहवालातील खालील बाबी राज्याच्या दृष्टीने मोठी चिंता व्यक्त करणाऱ्या आहेत."

आपल्या पोस्टमध्ये पाटील पुढे म्हणाले, "याआधी दरडोई उत्पन्नात क्रमांक १ वर असणारे आपले महाराष्ट्र राज्य ६ व्या क्रमांकावर गेले आहे. कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि शेजारचे गुजरात राज्यही आपल्या पुढे आहेत. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षांत महाराष्ट्र हा ५ व्या क्रमांकावर होता. आता आपल्या राज्याची घसरण ६ व्या क्रमांकावर झाली आहे. मधल्या काळात आपल्या राज्यातील जे प्रकल्प इतर राज्यात विशेषतः गुजरातला पाठवण्यात आले त्याचे परिणाम आपल्या महाराष्ट्राला भोगावे लागले हे यातून सिद्ध होते."

दरडोई उत्पन्नात कोणती राज्ये अव्वल

तेलंगणा - रु. 3,11,649

कर्नाटक - रु. 3,04,474

हरियाणा - रु 2,96,592

तामिळनाडू - रु 2,75,583

गुजरात - रु 2,73,558

महाराष्ट्र - रु. 2,52,389

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT