Personal Loan Sakal
Personal Finance

Personal Loan: पर्सनल लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणं फायद्याचं की तोट्याचं? EMI वर असा होतो परिणाम?

पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर कसे करू शकता?

राहुल शेळके

Personal Loan: जेव्हा तुम्ही एका बँकेकडून पर्सनल लोन घेता, तेव्हा तुम्हाला ते दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्याची सुविधाही मिळते. याला बॅलन्स ट्रान्सफर म्हणतात.

यामध्ये, तुम्हाला पर्सनल लोन प्रमाणेच नवीन कर्जदाराकडे कोणतेही तारण ठेवण्याची गरज नाही. यासाठी तुमच्याकडून काही शुल्क वसूल केले जात असले तरी तुम्हाला त्याचे अनेक फायदेही आहेत.

बॅलन्स ट्रान्सफरवर तुम्हाला तुमच्या कर्जावर मिळणारा व्याजदर पूर्वीपेक्षा कमी असेल. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी बॅलन्स ट्रान्सफर करणे किती फायद्याचे आहे हे जाणून घ्या.

पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफरचे फायदे

पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा देणाऱ्या बँकांचा व्याजदर कमी असतो. अशा परिस्थितीत, जर तुमची थकबाकी जास्त असेल तर, बॅलन्स ट्रान्सफर केल्यावर, तुम्हाला कर्जावर कमी व्याज द्यावे लागेल.

तर, पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर तुम्हाला तुमच्या कर्जासाठी दीर्घ कालावधी निवडण्याचा पर्याय देखील देते. यामुळे तुमचा मासिक EMI भार बराच कमी होतो. याशिवाय, तुम्हाला नवीन बँकेकडून टॉप-अप पर्सनल लोनची सुविधा देखील मिळू शकते.

बॅलन्स ट्रान्सफर कसे करू शकता?

पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्यापूर्वी, तुम्ही कर्जाचा सध्याचा व्याजदर आणि तुम्ही ज्या बँकेत कर्ज ट्रान्सफर करणार आहात त्या बँकेच्या व्याजदराची तुलना करावी. यानंतर, बॅलन्स ट्रान्सफर शुल्क इत्यादींबद्दलची माहिती मिळवा.

बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या बँकेकडून एनओसी आणि फोरक्लोजरसाठीचा अर्ज घेणे आवश्यक आहे.

यानंतर, परतफेडीची संपूर्ण कागदपत्रे जमा करा. मागील बँकेतील तुमचे कर्ज खाते बंद करा आणि तुमची कागदपत्रे नवीन बँकेत जमा करा आणि पुढील EMI भरा.

व्याज आणि EMI वर काय परिणाम होईल?

जर तुम्ही पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित केले तर तुम्हाला त्याचा सर्वात मोठा फायदा कमी व्याजदराच्या रूपात पाहायला मिळेल.

बॅलन्स ट्रान्सफर करून, तुमच्या कर्जावरील एकूण व्याज किंचित कमी होते. याशिवाय, तुम्हाला पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर करताना कर्जाचा कालावधी वाढवण्याचा पर्याय देखील मिळतो. असे केल्याने तुमच्या मासिक EMI चा भार थोडा कमी होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT