PhonePe Loans: डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe वर लवकरच पर्सनल लोन उपलब्ध करुन देणार आहे. PhonePe वापरकर्ते आता त्यांच्या PhonePe अॅपवरून सहजपणे पर्सनल लोन घेऊ शकतील. अहवालानुसार, PhonePe पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2024 पर्यंत आपल्या प्लॅटफॉर्मवर ग्राहक कर्ज लॉन्च करण्याची योजना आखत आहे.
PhonePe कंपनीने डिजिटल पेमेंट क्षेत्रात चांगली पकड निर्माण केली आहे, कंपनी आता नवीन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पाच बँका आणि NBFC ने PhonePe प्लॅटफॉर्मवर येण्यास सहमती दर्शवली आहे.
लवकरच कंपनी याबाबत घोषणा करणार आहे. जवळपास 6 महिन्यांत PhonePe वर अनेक प्रकारची उत्पादने लोकांना उपलब्ध करून दिली जातील. सध्या कंपनी आपल्या ग्राहक डेटाबेसमधून अशा लोकांचा शोध घेत आहे जे विविध प्रकारच्या कर्जासाठी पात्र आहेत. हळूहळू कंपनी त्यांना ऑफर पाठवायला सुरुवात करेल.
कंपनीचे 56 लाख विमा पॉलिसी ग्राहक
PhonePe कंपनीने 50 कोटींहून अधिक ग्राहकांना विमा पॉलिसी विकली आहे. कंपनीने आधीच आपल्या प्लॅटफॉर्मवर विमा सेवा सुरू केली आहे. सध्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर जीवन, आरोग्य, मोटार आणि कार विमा उपलब्ध आहेत.
यासाठी PhonePe ने ACKO सह अनेक कंपन्यांशी करार केला आहे. PhonePe द्वारे विमा घेतल्यावर ग्राहक EMI द्वारे देखील पेमेंट करू शकतात. या वर्षी जुलैपर्यंत कंपनीने 56 लाख पॉलिसी विकल्या आहेत.
कंपनीने नुकताच 50 कोटी ग्राहकांचा आकडा पार केला आहे. याशिवाय, PhonePe प्लॅटफॉर्मवर सुमारे 3.7 कोटी व्यापारी आहेत. अलीकडेच कंपनीने क्रेडिट कार्ड सेवा सुरू करण्यासाठी अॅक्सिस बँकेशीही चर्चा केली होती. ही सेवाही लवकरच सुरू होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.