PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही एक महत्वाकांक्षी सरकारी योजना आहे. ज्याचा उद्देश देशातील निम्न आणि मध्यमवर्गीय लोकांना परवडणाऱ्या घरांच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. पण योजनेच्या काही महत्त्वाच्या अटींचे पालन केले नाही, तर सरकार या योजनेंतर्गत दिलेली अनुदानाची रक्कम देखील काढू शकते.
लाभार्थ्याने बँक किंवा वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या गृहकर्जाची नियमित भरणा केली असेल तरच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळू शकतो. लाभार्थ्याने कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यास आणि थकबाकी न भरल्यास, सरकार अनुदान काढून घेऊ शकते.
कर्ज डिफॉल्टमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर तर खराब होईलच, परंतु तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी देखील गमवावी लागू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे फार महत्वाचे आहे.
जेव्हा तुम्ही घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करता तेव्हा PMAY अंतर्गत सबसिडीचा लाभ मिळतो. लाभार्थ्याने कोणत्याही कारणास्तव घरबांधणीचे काम थांबवल्यास किंवा ते अपूर्ण राहिल्यास, अनुदान काढून घेण्याचा अधिकार सरकारकडे आहे.
यामागचा मुख्य उद्देश हा आहे की, ज्यांना घर बांधायचे किंवा खरेदी करायचे आहे अशा लोकांनाच या योजनेचा लाभ मिळावा. अपूर्ण प्रकल्पांमुळे सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि ते नियमांचे उल्लंघन मानले जाते. त्यामुळे घराचे बांधकाम वेळेत पूर्ण होईल याची खात्री करा.
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना राहण्यासाठी स्वत:चे घर मिळावे, हा प्रधानमंत्री आवास योजनेचा उद्देश आहे. योजनेंतर्गत अनुदान मिळाल्यानंतर एखाद्या लाभार्थ्याने घर खरेदी केले, परंतु ते स्वत: त्या घरात राहत नसेल किंवा ते भाड्याने देत असेल, तर या योजनेचा गैरवापर होत आहे असा विचार सरकार करु शकते. अशा परिस्थितीत सबसिडी काढून घेतली जाऊ शकते. लाभार्थ्याने स्वतः घरात राहणे आणि त्याचा वैयक्तिक वापर करणे बंधनकारक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.