PM Kisan 14th Installment Sakal
Personal Finance

PM Kisan Yojana: काही तासातच PM मोदी देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खात्यात येणार 2,000 हजार रुपये, तुमचे नाव कसे तपासायचे?

PM Kisan Samman Nidhi: लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?

राहुल शेळके

PM Kisan Samman Nidhi Yojana 14th Installment: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी म्हणजेच आज देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान निधीच्या रूपात गिफ्ट देणार आहेत. आज या योजनेचा 14वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात 17,000 कोटी रुपये जमा होणार आहेत.

सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, राजस्थानमधील सीकरमध्ये एक कार्यक्रम होणार आहे, ज्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. PM किसान सन्मान निधी याेजना (PM-Kisan) सुमारे 4 वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती.

सरकारने 2.42 लाख कोटी दिले आहेत

पीएम किसान योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित केला जातो. फेब्रुवारी 2019 पासून, देशातील 11 कोटींहून अधिक शेतकर्‍यांना 2.42 लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, या कार्यक्रमात मोदी 1.25 लाख पीएम किसान समृद्धी केंद्र म्हणजेच पीएमकेएसके देशात सुरु करतील. सरकार देशातील किरकोळ खतांची दुकाने टप्प्याटप्प्याने पीएम किसान समृद्धी केंद्रात रूपांतरित करत आहे.

ही केंद्रे शेतकऱ्यांना कृषी कच्चा माल, माती परीक्षण, बियाणे आणि खते पुरवतील. जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.

NPCI लिंक केलेले बँक खाते

तुमचे बँक खाते NPCI शी लिंक केलेले नसल्यास, तुम्हाला तात्काळ तुमच्या स्थानिक पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागेल आणि पुढील हप्ता मिळवण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये नवीन खाते उघडावे लागेल कारण भारत सरकारने टपाल खात्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यांशी आधार आणि NPCI लिंक करण्याची परवानगी दिली आहे.

लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे

  • यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.

  • होमपेजवर तुम्हाला Former Corner चा पर्याय दिसेल, इथे क्लिक करा

  • आता तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल

  • पुढील पानावर तुम्हाला राज्य, जिल्हा, गाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.

  • Get Report वर क्लिक करा

  • संपूर्ण तपशील आता तुमच्यासमोर उघडेल

ई-केवायसी करणे अनिवार्य

शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसेल तर पीएम किसान योजनेची रक्कम दिली जाणार नाही. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर ई-केवायसीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय सीएससी केंद्रावर जाऊनही ई-केवायसी करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT