Rs 75 Coin In India Launch News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त एक विशेष स्मारक तिकीट आणि 75 रुपयांचे नाणे जारी केले.
नवीन संसद भवनाच्या लोकसभा सभागृहात झालेल्या उद्घाटन समारंभात त्यांनी नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. तुम्ही हे नाणे कुठून विकत घेऊ शकता? आणि यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील? जाणुन घ्या.
75 रुपयांचे नाणे कसे आहे?
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नाण्याचे वजन 34.65 ग्रॅम ते 35.35 ग्रॅम दरम्यान आहे.
नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी अशोक स्तंभाची प्रतिमा आहे, एका बाजूला देवनागरी लिपीत 'भारत' आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजीमध्ये 'इंडिया' लिहीलेले आहे.
75 रुपयांचे नाणे कोठे खरेदी करू शकता?
विशेष प्रसंगी जारी केलेली नाणी अनेक संकेतस्थळांवरून खरेदी करता येतात. यापैकी एक आहे indiagovtmint.in. येथे तुम्हाला विशेष प्रसंगी जारी केलेली नाणी सहज मिळतील. महत्त्वाचे म्हणजे विशेष प्रसंगी जारी केलेली नाणी सामान्य खरेदी आणि विक्रीसाठी नाहीत.
तुम्हाला 75 रुपयांचे नाणे किती रुपयांना मिळेल?
मन की बातच्या 100 व्या भागाची नाणी https://www.indiagovtmint.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ज्याची किंमत 3494 रुपयांपासून 3781 रुपयांपर्यंत आहे.
वेबसाइटवर उपलब्ध वेगवेगळ्या प्रसंगी जारी केलेल्या नाण्यांची सरासरी किंमत रु.3500 पेक्षा जास्त आहे. मात्र, 75 रुपयांची नाणी सध्या वेबसाइटवर उपलब्ध नाहीत. लवकरच ही नाणी खरेदीसाठी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
ही नाणी महाग का आहेत?
ही नाणी विशेष प्रसंगी जारी केली जातात. दुसरे कारण म्हणजे या नाण्यांची किंमत. 75 रुपयांच्या नाण्याचे वजन सुमारे 35 ग्रॅम आहे. ज्यामध्ये 50 टक्के चांदी असेल. इतर 50 टक्के तांबे, निकेल राहील. या कारणांमुळे तुम्हाला 75 रुपयांचे नाणे महाग मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.