PNB bank  sakal
Personal Finance

PNB Alert: पीएनबीने ग्राहकांना दिला इशारा! चुकूनही 'या' लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर खाते...

देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे.

राहुल शेळके

Punjab National Bank Alert: देशातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. बँकेने फेक मेसेजवर ही माहिती दिली आहे.

PNB ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार बँकेच्या 130 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांना बनावट मेसेज (PNB Fraud Alert) पाठवत आहेत.

एका मोठ्या ब्रँडच्या ओळखीचा गैरवापर करून ग्राहकांचे पैसे लुटण्याचे हे प्रकरण असल्याचे बँकेने म्हटले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आज बँकेच्या 130 व्या वर्धापन दिनानिमित्त मेसेज आला असेल तर सावधान. अन्यथा तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे गमवाल.

बँकेने ट्विट करून माहिती दिली:

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे की सावधान! पंजाब नॅशनल बँकेने आपल्या 130 व्या वर्धापन दिनानिमित्त कोणतीही ऑफर दिलेली नाही.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणी अशी लिंक पाठवली तर चुकूनही त्यावर क्लिक करू नका. यासोबतच अशा लिंक्स शेअर करणे टाळा.

PNB ने सायबर सुरक्षेबद्दल माहिती दिली:

पंजाब नॅशनल बँकेने सर्वसामान्यांना बँकेच्या नावावर पाठवलेल्या कोणत्याही मेसेजवर विचार न करता क्लिक करू नका, असा सल्ला दिला आहे. यासह, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सारख्या माध्यमांवर प्रसारित होणारे संदेश क्रॉस-चेक करा.

जर कोणी तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, आधार क्रमांक, पॅन क्रमांक आणि बँकिंग तपशील जसे की खाते क्रमांक, क्रेडिट/डेबिट कार्ड, ओटीपी कोणत्याही संस्थेच्या नावावरील लिंकवर क्लिक करून विचारले तर चुकूनही हे तपशील शेअर करू नका. असे केल्याने तुमचे खाते साफ होऊ शकते.

सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या नावाने फसवणूक करत आहेत:

ऑफर्सशिवाय सायबर गुन्हेगार इतर अनेक मार्गांनी ग्राहकांची लूट करत आहेत. यामध्ये केवायसी आणि पॅन अपडेटच्या नावाखाली फसवणूक होणे सामान्य झाले आहे.

तुमचे खाते निष्क्रिय होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही आजच KYC किंवा PAN अपडेट पूर्ण करा, असा संदेश फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांना पाठवला जातो. त्यासाठी त्यांना लिंकही पाठवली जाते.

यानंतर, या लिंकवर क्लिक केल्यानंतर, ग्राहकांना त्यांची वैयक्तिक माहिती विचारली जाते. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे गुन्हेगार ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपये चोरतात.

तुम्हाला असा कोणताही संदेश मिळाल्यास, त्याकडे नीट लक्ष द्या आणि शाखेला भेट देऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT