Mehul Choksi esakal
Personal Finance

PNB Scam: मेहुल चोक्सीच्या पत्नीची जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी कोर्टात धाव, काय आहे प्रकरण?

PNB Scam: मेहुल चोक्सीच्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली आहे.

राहुल शेळके

PNB Scam: पंजाब नॅशनल बँकेसोबत (पीएनबी) फसवणूक केल्याप्रकरणी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती कोठारी हिने न्यायालयात धाव घेतली आहे.

13,000 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी प्रीतीने मंगळवारी विशेष न्यायालयात धाव घेतली आणि तिच्याविरुद्ध जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी केली.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोठारीचे नाव गेल्या वर्षी जूनमध्ये दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात आरोपी म्हणून होते. कोठारी यांच्यावर मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला 'गुन्ह्याची रक्कम लपविण्यात' मदत केल्याचा आरोप आहे.

कोठारी यांनी दावा केला की, ती अँटिग्वा आणि बारबुडा येथील रहिवासी असल्याच्या कारणास्तव कायदेशीर कार्यवाहीबद्दल तिला आतापर्यंत माहिती नव्हती आणि मनी लाँडरिंगचा खटला दाखल होण्यापूर्वी 2018 मध्ये तिची तेथे बदली झाली होती.

याचिकेत म्हटले आहे की, सध्याच्या अर्जदाराचे (कोठारी) परदेशी नागरिकत्व आणि भारताबाहेर राहण्याचे ठिकाण भारतीय अधिकाऱ्यांना माहीत होते. न्यायालयाने ईडीला आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आणि या प्रकरणाची सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

ईडीने 2018 आणि 2020 मध्ये पहिले दोन आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर चोक्सीवरील हे तिसरे आरोपपत्र आहे.

ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने चोक्सी, त्याचा हिरे व्यापारी पुतण्या नीरव मोदी आणि त्यांचे कुटुंबीय, कर्मचारी, बँक अधिकारी आणि इतरांविरुद्ध मुंबईतील पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेत कथित फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

असा आरोप आहे की चोक्सी, त्याची कंपनी गीतांजली जेम्स आणि इतरांनी काही बँक अधिकार्‍यांच्या संगनमताने पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT