Porsche car history information about founder of car first electric vehicle  Sakal
Personal Finance

Porsche First Car: शंभर वर्षांपूर्वी बनवणार होता इलेक्ट्रिक कार पण बनली भन्नाट स्पीडस्टर, कोण होता पोर्शे?

Porsche First Car: लक्झरी कार निर्माता कंपनी पोर्शने सांगितले होते की कंपनीचे संस्थापक फर्डिनांड पोर्श यांनी डिझाइन केलेली पहिली कार इलेक्ट्रिक कार होती. कंपनीने जर्मनीतील स्टुटगार्ट-झुफेनहॉसेन येथील संग्रहालयात आयोजित केलेल्या प्रदर्शनात ही कार प्रदर्शित केली होती.

राहुल शेळके

Porsche First Car: पुण्यात एका अल्पवयीन मुलाने चालविलेल्या वेगवान लक्झरी कार पोर्शने मोटारसायकलला धडक दिली. यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर आणि अल्पवयीन मुलाला दारू पुरवणाऱ्या बारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भीषण अपघातानंतर अवघ्या 15 तासांत आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. पण या अपघातात ज्या लक्झरी कारने धडक दिली ती कार चर्चेत आली आहे. त्या कारचा निर्माता होता फर्डिनांड पोर्श. पोर्श कार कशी तयार झाली? या कारचा इतिहास काय आहे? जाणून घेऊया.

लक्झरी कार निर्माता कंपनी पोर्शने सांगितले होते की कंपनीचे संस्थापक फर्डिनांड पोर्श यांनी डिझाइन केलेली पहिली कार इलेक्ट्रिक कार होती. कंपनीने जर्मनीतील स्टुटगार्ट-झुफेनहॉसेन येथील संग्रहालयात आयोजित केलेल्या प्रदर्शनात ही कार प्रदर्शित केली होती.

उत्पादनाच्या वेळी, कारला एगर लोहनर इलेक्ट्रिक व्हेईकल C.2 फेटन मॉडेल असे नाव देण्यात आले होते. 1898 साली बनवलेली ही कार अलीकडेच ऑस्ट्रियातील एका गॅरेजमध्ये सापडली, जिथे ती 1902 पासून ठेवण्यात आली होती. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी फर्डिनांड पोर्शने कार निर्माता जेकोब लोहनरसाठी ही कार डिझाइन केली होती. पुढे पोर्शने 1931 मध्ये स्वतःची कार कंपनी सुरू केली.

पोर्शने बनवलेल्या या पहिल्या कारच्या मागील बाजूस इलेक्ट्रिक इंजिन होते. ते ताशी 34 किलोमीटर वेगाने धावत होते. याच काळात लुडविग लोहनर यांना समजले की घोडागाडीचे युग संपत आहे. त्याने फर्डिनांड पोर्शेला विजेवर चालणारी कार बनवायला सांगितली.

फर्डिनांड पोर्शने इलेक्ट्रिक बॅटरीद्वारे चालणारी 'अष्टकोनी इलेक्ट्रिक मोटर' तयार केली. या मोटरमध्ये एकूण 12 गीअर्स होते, ज्यामध्ये सहा फॉरवर्ड गीअर्स, दोन रिव्हर्स गीअर्स आणि ब्रेकिंगसाठी चार गीअर्स होते. ही कार 26 जून 1898 रोजी व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे रस्त्यावर चालू लागली.

एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, ही कार ताशी 34 किलोमीटर वेगाने 49 मैलांपर्यंत प्रवास करू शकते. 28 सप्टेंबर 1899 रोजी बर्लिन येथे झालेल्या बर्लिन रोड रेसमध्ये पोर्शने या कारचा समावेश केला होता.

पोर्शने डिझाइन केलेली ही पहिली कार सध्या जर्मनीतील स्टुटगार्ट झुफेनहाऊसेन येथे प्रदर्शनासाठी आहे. फर्डिनांड पोर्शने ही कार कार निर्माता जेकोब लोहनरसाठी डिझाइन केली होती. पोर्शने या कारच्या प्रत्येक भागावर P1 असा शिक्का मारला होता जेणेकरून ती इतर मॉडेल्सपेक्षा वेगळी ओळखता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT