Women Scheme sakal
Personal Finance

Women Scheme : पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजना 2024

8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला महिलांसाठीच्या स्पेशल स्कीम्सबाबत सांगणार आहोत. पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ((Mahila Samman Bachat Patra) ही योजना एप्रिल 2023 मध्ये सुरू करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला महिलांसाठीच्या स्पेशल स्कीम्सबाबत सांगणार आहोत. पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ((Mahila Samman Bachat Patra) ही योजना एप्रिल 2023 मध्ये सुरू करण्यात आली आहे. ही एक छोटी बचत योजना आहे ज्याचा उद्देश महिलांच्या आर्थिक वाढीला चालना देणे आहे. महिला सन्मान बचत पत्र पोस्ट ऑफिस, तसंचे पीएसयू बँका आणि निवडक खासगी बँकांमध्ये उपलब्ध आहे.

इंडिया पोस्ट वेबसाइटनुसार, (indiapost.gov.in) पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजना पात्र ग्राहकांना 2 लाखांपर्यंतची एकापेक्षा जास्त खाती उघडण्याची परवानगी देते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेबद्दलच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

1. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते कोण सुरु करू शकते?

- महिला स्वत:साठी किंवा त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या वतीने या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

2. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र व्याजदर

- महिला सन्मान बचत योजना 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीनुसार 7.5 टक्के वार्षिक व्याज देते.

3. परिपक्वता कालावधी

- महिला सन्मान बचत योजना खाते उघडल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीत परिपक्व होते.

4. खाते कसे उघडायचे?

- केवायसी डॉक्युमेंट्स (आधार आणि पॅन), पे-इन स्लिप आणि पोस्ट ऑफिसमध्ये कॅश किंवा चेकमध्ये गुंतवल्या जाणाऱ्या पैशांसह अर्ज सादर करून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते सुरु करू शकतात.

5. व्याज कसे दिले जाते?

- मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम (मुद्दल तसेच व्याज) ठेवीदाराच्या खात्यात जमा केली जाते.

6. किमान गुंतवणूक

- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना खाते सुरु करण्यासाठी किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

7. कमाल गुंतवणूक

- प्रत्येक ग्राहकाच्या खात्यावर 2 लाखांची कमाल मर्यादा लागू आहे.

8. एकापेक्षा अधिक खात्यांना परवानगी आहे का?

- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना एकाच ठेवीदाराला किमान तीन महिन्यांच्या अंतरासह एकापेक्षा अधिक खात्यांना परवानगी देते.

9. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत वेळ पुर्ण होण्याआधी काही पैसे काढण्याची परवानगी आहे का?

- खाते सुरु केल्याच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते.

10. प्रीमॅच्युअर क्झोझिंग

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडण्याच्या तारखेपासून सहा महिने पूर्ण झाल्यानंतर मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. तथापि, अकाली बंद केल्याने लागू व्याजदरात 200 बेसिस पॉइंट्स (दोन टक्के पॉइंट्स) घट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT