Post Office  sakal
Personal Finance

Post Office Investment: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेवर मिळेल जास्त व्याज, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर मिळतील 7 लाख

अर्थ मंत्रालयाने जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्याची घोषणा केली आहे.

राहुल शेळके

Post Office Recurring Deposit: अर्थ मंत्रालयाने जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्याची घोषणा केली आहे. या बदलांतर्गत 5 वर्षांची आवर्ती ठेव अधिक आकर्षक करण्यात आली आहे. सरकारने आपल्या व्याजदरात तब्बल 30 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.

आता पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेवीवर 6.2 टक्क्यांऐवजी 6.5 टक्के व्याज मिळणार आहे. याशिवाय, 1 वर्ष, 2 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 10 आधार अंकांची वाढ करण्यात आली आहे.

1 जुलै 2023 पासून नवीन व्याजदर लागू

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवरील (RD) नवीन व्याज दर 1 जुलै 2023 पासून लागू आहे, जो 30 सप्टेंबर 2023 पर्यंत राहील. ही एक योजना आहे जी मध्यम मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी आहे.

6.5 टक्के वार्षिक व्याज आहे, परंतु याची गणना तिमाही चक्रवाढीच्या आधारे केली जाते. किमान रु. 100 आणि त्यानंतर रु. 100 च्या पटीत कोणतीही रक्कम जमा केली जाऊ शकते.

बँक व्यतिरिक्त इतर पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव केवळ 5 वर्षांसाठी असते. नंतर ती पुन्हा 5 वर्षांसाठी वाढवता येईल. मुदतवाढीदरम्यान, फक्त जुने व्याजदर उपलब्ध असतील.

10 हजार जमा केल्यावर तुम्हाला 7.10 लाख मिळतील

पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 10 हजार रुपये जमा केले तर पाच वर्षानंतर त्याला 7 लाख 10 हजार रुपये मिळतील. त्याचे एकूण ठेव भांडवल रुपये 6 लाख असेल आणि व्याजाधरुन गुंतवणूकदाराला सुमारे 1 लाख 10 हजार रुपये मिळतील.

कोणत्या तारखेपर्यंत हप्ता जमा करणे आवश्यक

जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिट खाते 1 ते 15 तारखेच्या दरम्यान उघडले असेल तर ते प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जमा करावे लागेल. 15 तारखेनंतर एका महिन्यात खाते उघडल्यास प्रत्येक महिन्याच्या अखेरीस हप्ता जमा करावा लागेल.

1 दिवसाच्या घाईने मोठे नुकसान होईल

12 हप्ते जमा केल्यानंतर कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. व्याजाचा दर RD खात्याच्या व्याजदरापेक्षा 2 टक्के अधिक असेल. 5 वर्ष पूर्ण हाण्याअगोदर 1 दिवस अगोदर जर खाते बंद केले तर फक्त बचत खात्यावरील व्याजाचा लाभ मिळेल. सध्या बचत खात्यावरील व्याजदर 4 टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT