Premier Roadlines IPO Sakal
Personal Finance

Premier Roadlines IPO : प्रीमियर रोडलाइन्सचा आयपीओ 10 मेपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार, तुम्ही तयार आहात का ?

प्रीमियर रोडलाइन्सचा (Premier Roadlines) आयपीओ 10 मेपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Premier Roadlines IPO : प्रीमियर रोडलाइन्सचा (Premier Roadlines) आयपीओ 10 मेपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. यात गुंतवणूकदारांना 14 मे पर्यंत यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल. आयपीओसाठी प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.

कंपनीने याची किंमत 63-67 रुपये प्रति शेअर ठेवली आहे. आयपीओच्या माध्यमातून 40.36 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग एनएसई एसएमईवर होईल. या आयपीओअंतर्गत 60.24 लाख फ्रेश इक्विटी शेअर जारी केले जातील. ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत कोणतीही विक्री होणार नाही.

कंपनी आयपीओमधील निधीचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी करेल. याशिवाय, हा निधी व्यावसायिक वापरासाठी, वर्किंग कॅश आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल. मशिताला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड ही प्रीमियर रोडलाइन्स आयपीओसाठी रजिस्ट्रार आहे, तर हेम सिक्युरिटीज लिमिटेड बुक रनिंग लीड मॅनेजर आहे.

प्रीमियर रोडलाइन्स आयपीओसाठीची लॉट साइज 2000 शेअर्सची आहे. त्यानुसार किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1 लाख 34 हजार गुंतवावे लागतील. सब्सक्रिप्शननंतर शेअर्सचे अलॉटमेंट 15 मे रोजी होणे अपेक्षित आहे. त्याच वेळी, रिफंड प्रक्रिया 16 मेपासून सुरू होईल. कंपनीच्या शेअर्सच्या लिस्टिंग 17 मे रोजी होऊ शकते.

प्रीमियर रोडलाइन्स लिमिटेडची स्थापना 2008 मध्ये झाली आणि ती कंपन्यांसाठी लॉजिस्टिक सोल्यूशन्स प्रदान करते. कंपनी संपूर्ण भारतामध्ये जनरल ट्रान्सपोर्टेशन , प्रोजेक्ट लॉजिस्टिक आणि ओवरसाइज/ओवरवेट कार्गो ट्रान्सपोर्टेशन ऑफर करते.

कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स सेगमेंटमध्ये, कंपनी B2B ग्राहकांना सेवा देते ज्यांना भारतात आणि नेपाळ, भूतान इत्यादी शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवावा लागतो.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT