Premji Invest: विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांची कौटुंबिक फर्म प्रेमजी इन्व्हेस्ट लवकरच बँक ऑफ बडोदाची उपकंपनी असलेल्या नैनिताल बँकेतील मोठा हिस्सा खरेदी करू शकते. त्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हा करार सध्या अंतिम टप्प्यात आहे, लवकरच हा करार निश्चित होऊ शकतो.
इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, प्रेमजी इन्व्हेस्ट महत्त्वाच्या मुद्द्यांवर वाटाघाटी करत आहेत. मात्र, संपादनाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की पहिल्या आठवड्यात सुमारे 51 टक्के शेअर्स विकले जातील आणि उर्वरित शेअर्सची निर्गुंतवणूक केली जाईल. सध्या, बँक ऑफ बडोदाकडे नैनिताल बँकेतील सुमारे 98 टक्के हिस्सेदारी आहे, बँक आपला संपूर्ण हिस्सा विकू शकते.
प्रेमजी इन्व्हेस्ट ही 10 अब्ज डॉलरहून अधिक मालमत्ता असलेली कंपनी आहे. भारतातील स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सक्रिय सहभागासाठी ही कंपनी ओळखली जाते.
पॉलिसीबाझार, लेन्सकार्ट आणि क्रेडिटबीसह विविध उपक्रमांमध्ये कंपनीचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. आता अझीम प्रेमजी गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात उतरणार आहेत. कंपनी आधीच नॉन-बँकिंग फायनान्सशी संबंधित आहे, त्यामुळे बँकिंग क्षेत्रात थेट गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.
नैनिताल बँक निर्गुंतवणूक योजनेत सहभागी होण्यासाठी RBI तांत्रिकदृष्ट्या सक्षम कंपनी शोधत आहे. याचे कारण म्हणजे कंपनीत तांत्रिक बदल घडवून आणावे लागतील. अशा परिस्थितीत, इतर अनेक फिनटेक कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी त्यात रस दाखवला आहे.
यामध्ये Zerodha, MobiKwik यांचाही समावेश आहे. नियामक फाइलिंगनुसार, नैनिताल बँक उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये 168 शाखांचे नेटवर्क चालवते.
नैनिताल बँकेची स्थापना 1922 मध्ये स्थानिक लोकांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली होती. 1973 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ बडोदाला त्यांच्या कामकाजावर देखरेख करण्याचे निर्देश दिले. आज नैनिताल बँकेच्या उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सुमारे 168 शाखा आहेत.
बँक आपल्या ग्राहकांना RTGS, NEFT, RuPay ATM सह डेबिट कार्ड, इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सेवा पुरवते. ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे की अझीम प्रेमजी फिनटेक आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत आणि या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना गिफ्ट सिटीमध्ये गुंतवणूक फंड उघडण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.