Tata Group sakal
Personal Finance

Tata Group : टाटा समूहाकडून होणार कर्नाटकात प्रकल्प उभारणी

‘टाटा’ समूहाचा भाग असलेल्या एअर इंडिया आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स(टीएएसएल) राज्यातील विविध प्रकल्पांसाठी दोन हजार ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : ‘टाटा’ समूहाचा भाग असलेल्या एअर इंडिया आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स(टीएएसएल) राज्यातील विविध प्रकल्पांसाठी दोन हजार ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत राज्य सरकारबरोबर सामंजस्य करार केला आहे.

कर्नाटकचे अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाचे प्रधान सचिव सेल्वकुमार आणि एअर इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी निपुण अग्रवाल आणि टीएएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकरण सिंग यांनी सामंजस्य करारांची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी सरकारचे मुख्य सचिव रजनीश गोयल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव एल. के. अतिक, उद्योग आयुक्त गुंजन कृष्णा,इतर अधिकारी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विधानसौध येथे झालेल्या करारांनंतर बोलताना एम. बी. पाटील म्हणाले, ‘‘टाटा समूहाच्या या गुंतवणुकीतून राज्यात थेट एक हजार ६५० नोकऱ्या निर्माण होणार आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी एअर इंडियाने बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हर-हॉल (एमआरओ) युनिट उभारण्यासाठी १३०० कोटींची गुंतवणूक करत आहे. त्यामुळे एक हजार २०० लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि २५ हजारांहून अधिक रोजगार अप्रत्यक्षपणे निर्माण होतील.’’

त्याचप्रमाणे टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (टीएएसएल) तीन प्रकल्पांसाठी १,०३० कोटी गुंतवणूक करणार आहे. यापैकी ४२० कोटी नागरी विमानांचे मालवाहतूक विमानात रूपांतर करण्यासाठी युनिट उभारण्याच्‍या कामासाठी वापरण्‍यात येतील. ३१० कोटी व्यतिरिक्त तोफा उत्पादन युनिटमध्ये गुंतवणुकीसह ३०० कोटी एरोस्पेस, संरक्षण संशोधन आणि विकास खर्चासाठी हाती घेतले जाईल.

टीएएसएल कंपनीला आवश्यक असलेल्या १३ हजार सुट्या भागांपैकी ५० टक्के पुरवठा बंगळूर विमानतळाजवळ आणि कोलार येथे उभारल्या जाणाऱ्या बंदूक उत्पादन युनिटद्वारे करण्याची योजना आखत आहे. यामुळे ३०० हून अधिक लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये दोन ते तीन हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

कर्नाटकात ६७ टक्के विमानांची निर्मिती

संरक्षण विभागाला आवश्यक असलेली ६७ टक्के विमाने आणि हेलिकॉप्टर कर्नाटकात तयार होतात. याशिवाय, देशाच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील निर्यात उलाढालीत राज्याचा वाटा ६५ टक्के आहे. देशातील या क्षेत्रातील ७० टक्के कंपन्या कर्नाटकात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT