Provide 26 weeks paid maternity leave to registered road construction workers  Sakal
Personal Finance

Maternity Leave: असंघटित क्षेत्रातील महिलांना मिळू शकते 26 आठवड्यांची पगारी प्रसूती रजा

Maternity Leave: महिलांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन देशात अनेक नियम करण्यात आले आहेत. त्यांना प्रसूती रजाही दिली जाते. पण आजवर असंघटित क्षेत्रात असं नव्हतं. केंद्र सरकारच्या पुढाकाराने महिला कामगारांना 26 आठवड्यांच्या प्रसूती रजेची सुविधा दिली जाणार आहे.

राहुल शेळके

Maternity Leave: महिलांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन देशात अनेक नियम करण्यात आले आहेत. त्यांना प्रसूती रजाही दिली जाते. पण आजवर असंघटित क्षेत्रात असं नव्हतं. मात्र केंद्र सरकारच्या पुढाकाराने रस्ते बांधणाऱ्या नोंदणीकृत महिला कामगारांना 26 आठवड्यांच्या प्रसूती रजेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या कालावधीत त्यांच्या पगारात कोणतीही कपात होणार नाही. कंपन्या महिलांच्या खात्यावर ऑनलाइन पगार पाठवतील. महिला दोनदा प्रसूती रजा घेऊ शकतात.

महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, या उपक्रमाचा उद्देश महिलांना सक्षम करणे आहे. इराणी म्हणाल्या की, कंपन्यांनी त्या मातांना 12 आठवड्यांची पगार रजा द्यावी.

महिलांना आवश्यक सुविधा मिळतील

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सक्षम नारी सशक्त भारत कार्यक्रमादरम्यान या उपक्रमाची घोषणा केली आहे. इराणी पुढे म्हणाल्या की, सल्लागारानुसार कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन पगार त्यांच्या खात्यात जमा करावेत.

पगारात कोणतीही कपात करू नये. त्या पुढे म्हणाल्या की, महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी रात्रीच्या शिफ्ट आणि ये-जा करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना जर एखाद्या महिलेचा गर्भपात झाला असेल तर तिला किमान 6 आठवड्यांची पगारी रजा द्यावी, असेही ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे.

प्रसूती रजा म्हणजे काय?

गरोदरपणात महिलांना प्रसूती रजेची सुविधा दिली जाते. ही रजा महिलांना बाळाच्या जन्मासाठी आणि त्याची प्राथमिक काळजी घेण्यासाठी दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unsold Player IPL Mega Auction 2025: अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर यांना फ्रँचायझींनी दाखवला 'ठेंगा'; मुंबईच्या खेळाडूचं नेमकं काय चुकलं?

IPL 2025 Auction Live: फाफ डू प्लेसिससाठी CSK-RCB आले नाहीत पुढे, तर सॅम करनला थालाच्या टीमनं स्वस्तात केलं खरेदी

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंची सारवासारव! थेट गृहमंत्री पदाची केली मागणी, म्हणाले...

MLA Siddharth Shirole : शिवाजीनगर विधानसभा नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विकासाचा अजेंडा

Earth Axis Tilt : धक्कादायक! पृथ्वी ३१.५ इंचांनी झुकली..भारत ठरतोय कारणीभूत, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT