Rahul Gandhi, with Constitution book Sakal
Personal Finance

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या हातातील संविधानाच्या मिनी कॉपीची तुफान विक्री; प्रकाशकानं कमावले लाखो रुपये

Rahul Gandhi, with Constitution book: लोकसभा निवडणुकीदरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने प्रतिक म्हणून संविधानाच्या पॉकेट आवृत्तीचा वापर केला. तेव्हापासून देशात संविधान पुन्हा चर्चेत आले आणि विशेषतः ही आवृत्ती लोकप्रिय झाली.

राहुल शेळके

Rahul Gandhi, with Constitution book: लोकसभा निवडणुकीदरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने प्रतिक म्हणून संविधानाच्या पॉकेट आवृत्तीचा वापर केला. तेव्हापासून देशात संविधान पुन्हा चर्चेत आले आणि विशेषतः ही आवृत्ती लोकप्रिय झाली. इंडिया आघाडीचे नेते निवडणुकीच्या वेळी ज्या संविधानाची प्रत घेऊन प्रचार करत होते त्या संविधानाच्या प्रतीच्या विक्रीचा विक्रम झाला आहे.

संविधानाच्या पॉकेट आवृत्तीच्या प्रकाशकाचा दावा आहे की केवळ तीन महिन्यांत त्यांच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. या पुस्तकाच्या प्रतीची किंमत किती आहे आणि गेल्या तीन महिन्यांत ही प्रत विकत घेण्यासाठी लोकांनी किती पैसे खर्च केले ते जाणून घेऊया.

संविधानाच्या पुस्तकाची लोकप्रियता कशी वाढली?

18व्या लोकसभेच्या उद्घाटन सत्रात विरोधी पक्षनेते संसद भवनाबाहेर जे पुस्तक हातात घेऊन उभे होते ते देशाचे संविधान होते. ही संविधानाची पॉकेट आवृत्ती आहे. जी सध्या खूप लोकप्रिय होत आहे. निवडणुकीत विरोधकांनी या पॉकेट आवृत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

राहुल गांधींपासून देशातील अनेक बड्या नेत्यांच्या हातात ही आवृत्ती दिसली. त्यामुळेच राज्यघटनेची प्रत पुन्हा एकदा देशातील तरुणांमध्ये लोकप्रिय झाली. संसद भवनात सर्व विरोधी पक्षनेत्यांनी ही प्रत हातात घेऊन शपथ घेतली.

तीन महिन्यांत 5 हजार प्रती विकल्या

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे पुस्तक आता एक आयकॉन बनले आहे आणि त्याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की गेल्या तीन महिन्यांत त्याच्या 5000 प्रती विकल्या गेल्या आहेत. या पॉकेट एडिशनच्या प्रकाशनाचे नाव ईस्टर्न बुक कंपनी म्हणजेच ईबीसी आहे.

ज्यांच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. संविधानाची पॉकेट आवृत्ती प्रथम 2009 मध्ये EBC ने छापली होती. तेव्हापासून 16 आवृत्त्या निघाल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, EBC प्रकाशक सुमीत मलिक यांनी दावा केला आहे की त्यांनी गेल्या तीन महिन्यांत पुस्तकाच्या 5,000 प्रती विकल्या आहेत.

मलिक यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, भारतीय संविधानाच्या पॉकेट आवृत्तीला खूप मागणी आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, काँग्रेसने 18व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रासाठी प्रतींनी भरलेले चार बॉक्सही खरेदी केले होते.

मलिक यांनी मीडिया रिपोर्टमध्ये असेही सांगितले की, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुस्तकाची एक प्रतही भेट दिली होती. माजी ॲटर्नी जनरल के के वेणुगोपालन यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे की, हे पुस्तक आकाराने लहान असले तरी याचे परिणाम खूप मोठे आहे.

किती आहे किंमत?

ईबीसीने प्रकाशित केलेल्या या प्रतीची किंमत 896 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या आवृत्तीत एकूण 624 पाने आहेत. विशेष म्हणजे ही प्रत प्रकाशित करण्याचा अधिकार ईबीसीला आहे. तुम्हाला ही प्रत ऑनलाइन ऑर्डर करायची असल्यास, तुम्ही EBC च्या स्टोअरवरुन ऑर्डर करू शकता. जिथे या आवृत्तीची किंमत ऑफलाइन पेक्षा 10 टक्के कमी म्हणजेच 806 रुपये आहे. ही किंमत नवीन आवृत्तीची आहे.

किती खर्च झाला?

गेल्या 3 महिन्यांत 5000 हजार प्रती विकल्या गेल्याचा दावा ईबीसीकडून करण्यात आला आहे. लोकांनी पुस्तक ऑफलाइन खरेदी केले आहे असे गृहीत धरले तर तीन महिन्यांत या प्रतीसाठी 44.75 लाख रुपये खर्च झाले आहेत. दुसरीकडे, प्रत्येकाने ही प्रत ऑनलाइन खरेदी केली असेल तर 44 लाख रुपये खर्च झाले आहेत असे समजू. जी मोठी गोष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

SCROLL FOR NEXT