raksha bandhan celebration mutual fund bank account insurance policy mediclaim sakal
Personal Finance

Raksha Bandhan : रक्षाबंधनाची ‘अर्थ’पूर्ण भेट !

भाऊ बहिणीला नेहमीपेक्षा वेगळी भेटवस्तू देऊन हा सोहळा ‘अर्थपूर्ण’ करू शकतो

-डॉ. वीरेंद्र ताटके

- डॉ. वीरेंद्र ताटके

रक्षाबंधन हा सण प्रत्येक बहिण-भावासाठी खूप खास असतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर रक्षाकवच म्हणजेच राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीची सुरक्षा करण्याचे वचन देतो आणि भेटवस्तूदेखील देतो. यानिमित्ताने भाऊ बहिणीला नेहमीपेक्षा वेगळी भेटवस्तू देऊन हा सोहळा ‘अर्थपूर्ण’ करू शकतो.

बँक खाते सुरू करून देणे

वयाने अगदी छोट्या बहिणीला रक्षाबंधनाला भेट म्हणून तिच्या नावे बँक खाते सुरू करून देता येऊ शकते. असे खाते तिच्या नावाने किंवा तिच्यासोबत पालकांच्या संयुक्त नावाने उघडता येऊ शकते.

या बँक खात्याच्या मदतीने छोट्या बहिणीला आपण आर्थिक शिक्षणाचे प्राथमिक धडे शिकवू शकतो. उदाहरणार्थ, बँकेत पैसे जमा करणे, बँकेतून पैसे काढणे, बँक खात्यातून शिक्षणाचे आणि इतर खर्च करणे इत्यादी. अशाप्रकारे रक्षाबंधनाच्या निमित्ताने छोट्या मुलींच्या आर्थिक शिक्षणाचा श्रीगणेशा करता येऊ शकतो.

आयुर्विमा पॉलिसी

रक्षाबंधनाच्या दिवशी आयुर्विम्याची पॉलिसी काढून देणे आणि त्याचा पहिला हप्ता भेट म्हणून देणे ही कल्पनादेखील खूप चांगली आहे. विशेषतः जी बहीण कमावती आहे आणि जिच्यावर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आहे,

अशा बहिणीची आयुर्विम्याची पॉलिसी नसेल, तर आपण पॉलिसी काढण्यात अवश्य पुढाकार घ्यावा. आयुर्विम्याची पॉलिसी निवडताना शक्यतो ‘टर्म इन्श्युरन्स’ निवडावा, जेणेकरून ‘जोखीम संरक्षण’ हा विम्याचा मूळ उद्देश साध्य होतो आणि वार्षिक हप्त्याची रक्कमदेखील कमी राहते.

मेडिक्लेम पॉलिसी

आयुर्विम्याप्रमाणेच महिला मेडिक्लेम पॉलिसी घेण्यातदेखील टाळाटाळ करतात. हल्लीच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक मोठे आजार कमी वयात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे उपचारांचा खर्च अचानकपणे ‘आ’ वासून पुढे उभा राहू शकतो. या कारणांमुळे प्रत्येक महिलेकडे मेडिक्लेम पॉलिसी असणे अत्यावश्यक आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला मेडिक्लेम पॉलिसी भेट देणे अतिशय योग्य ठरेल.

दीर्घकालीन गोल्ड एसआयपी

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला गोल्ड म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणूक भेट देता येऊ शकते. बहिणीचे डी-मॅट खाते असेल, तर त्याच्या खात्यातून ही ‘एसआयपी’ सुरू करता येते. खाते नसले, तर ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून ते सुरू करता येऊ शकते.

‘एसआयपी’चा पहिल्या महिन्यातील हप्त्याची रक्कम आपल्यातर्फे भेट देऊन बहिणीला ती ‘एसआयपी’ पुढे सुरू ठेवण्यासाठी भाऊ प्रोत्साहित करू शकतो. अशाप्रकारे सोन्यात नियमित गुंतवणूक करण्याचे फायदे मिळू शकतात.

पीपीएफ खाते

रक्षाबंधनाची भेट म्हणून अत्यंत सुरक्षित समजले जाणारे आणि दीर्घकाळात उत्तम परतावा देणारे ‘पीपीएफ’ खाते आपण बहिणीला सुरू करून देऊ शकतो. फक्त शंभर रुपये जमा करून ‘पीपीएफ’ खाते सुरू करता येते.

त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षात संबंधित व्यक्ती किमान पाचशे रुपये आणि कमाल दीड लाख रुपये त्या खात्यात जमा करू शकते. खात्याची मुदत पंधरा वर्षे असल्याने मुदतीअखेर खात्यातील मुद्दल आणि व्याज अशी मिळून मोठी रक्कम तयार होते.अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण ‘अर्थपूर्ण’ साजरा करता येऊ शकतो.

(लेखक इंदिरा ग्लोबल स्कूल ऑफ बिझनेस, पुणे येथे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT