Bank Holiday Sakal
Personal Finance

Bank Holiday: रामनवमी निमित्त बँका चालू राहणार की बंद? कोणत्या भागात बँकांना असणार सुट्टी

Bank Holiday on Ram Navami 2024: रामनवमी हा मोठा सण आहे. यंदा 17 एप्रिलला रामनवमी साजरी होत आहे. या सणाच्या दिवशी देशातील बहुतांश सरकारी कार्यालये बंद असतात. अनेक राज्यांमध्ये बँकाही बंद आहेत. वेगवेगळ्या राज्यांतील सणांनुसार सुट्ट्या असतात.

राहुल शेळके

Bank Holiday on Ram Navami 2024: रामनवमी हा मोठा सण आहे. यंदा 17 एप्रिलला रामनवमी साजरी होत आहे. या सणाच्या दिवशी देशातील बहुतांश सरकारी कार्यालये बंद असतात. अनेक राज्यांमध्ये बँकाही बंद आहेत. वेगवेगळ्या राज्यांतील सणांनुसार सुट्ट्या असतात. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामुळे बँका बंद राहणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, 17 एप्रिलला रामनवमीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. भगवान राम जन्मानिमित्त साजऱ्या होणाऱ्या या उत्सवामुळे बुधवारी बँका बंद असलेल्या राज्यांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओरिसा, चंदीगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. (Ram Navami 2024 bank holiday Banks to remain closed on April 17 for Ram Navami in several states)

पहिल्या टप्प्यातील मतदान

या आठवड्यानंतर 19 एप्रिललाही अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. या आठवड्यात बँकांच्या सुट्टीचे कारण म्हणजे लोकसभा 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान. लोकसभा निवडणूक 2024 ची सुरुवात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाने होत आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासोबतच काही राज्यांमध्ये 19 एप्रिलला विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे.

या राज्यांनी सुट्टी जाहीर केली

निवडणुकांमुळे अनेक राज्यांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्याही मिळणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने 19 एप्रिलला सुट्टी जाहीर केली आहे. नागालँड सरकारने सर्व सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना पगारी रजा जाहीर केली आहे. तमिळनाडू सरकारनेही 19 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

एप्रिल 2024च्या या दिवसांतही बँका बंद राहतील

  • 21 एप्रिल 2024- रविवारमुळे सर्व बँका बंद राहतील.

  • 27 एप्रिल 2024- चौथ्या शनिवारमुळे बँकांना सुट्टी असेल.

  • 28 एप्रिल 2024- रविवारमुळे बँकांना सुट्टी असेल.

बँका बंद असताना ऑनलाइन सेवा सुरू राहतील

बँक बंद असताना बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करता येत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही मोबाईल किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून बँकेशी संबंधित कामे घरी बसून करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता. याशिवाय तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारेही डिजिटल पेमेंट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : मला कोणी गाडू शकत नाही- अब्दूल सत्तार

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT