Ratan Tata 5 major works  Sakal
Personal Finance

Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

राहुल शेळके

Ratan Tata Passes Away: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. भारतात ज्यावेळी उद्योगपतींचा उल्लेख होतो. रतन टाटा यांचे नाव प्रथम घेतले जाईल. आपल्या जीवनाच्या प्रवासात त्यांनी अनेक ऐतिहासिक कामे केली.

खरे तर रतन टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक देखील म्हटले जाते. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाने लोकांना प्रभावित केले. रतन टाटा यांनी या जगाला अनेक मौल्यवान भेटवस्तू दिल्या. त्यांचे योगदान आज भारतासह संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. राष्ट्र उभारणीत रतन टाटा यांचे अगणित योगदान आहे, जे विसरता येणार नाही. पण त्यांच्यापैकी काही योगदान असे आहे ज्यांनी काळाच्या क्षितिजावर छाप सोडली आहे.

ज्या वेळी संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीशी झुंजत होते, त्याच वेळी भारतही आरोग्याच्या संकटाशी लढत होता. या संकटाच्या काळात रतन टाटा पुढे आले आणि त्यांनी देशाला 500 कोटी रुपयांची मदत दिली. त्यांनी X (x) वर लिहिले, कोविड-19 हे आपल्यासमोरील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्या भूतकाळातही देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे आल्या आहेत. या वेळेची गरज इतर वेळेपेक्षा जास्त आहे.

रतन टाटा त्यांच्या सौम्य स्वभावासाठी आणि उदार हृदयासाठी ओळखले जात होते. त्यांना श्वानांची खूप आवड होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी श्वानांसाठी रुग्णालय उघडले. रुग्णालयाचे उद्घाटन करताना ते म्हणाले होते की, मी श्वानांना माझ्या कुटुंबाचा भाग मानतो. रतन टाटा पुढे म्हणाले होते की, मी माझ्या आयुष्यात अनेक पाळीव प्राणी पाळले आहेत.

यामुळे मला हॉस्पिटलचे महत्त्व कळते. त्यांनी नवी मुंबईत बांधलेले रुग्णालय पाच मजली असून, त्यामध्ये एकाच वेळी 200 पाळीव प्राण्यांवर उपचार करता येतात. हे रुग्णालय 165 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे.

रतन टाटा यांचे पाळीव प्राण्यांबद्दलचे प्रेम यावरूनही समजू शकते की ते एकदा श्वानाला मिनेसोटा विद्यापीठात घेऊन गेले होते. जिथे श्वानाची जॉइंट रिप्लेसमेंट करण्यात आली.

टाटा समूह पूर्वी फक्त मोठ्या वाहनांच्या निर्मितीसाठी ओळखला जात होता. पण 1998 मध्ये रतन टाटा यांनी छोट्या वाहनांच्या जगातही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी टाटा इंडिका बाजारात आणली. टाटा इंडिका ही पूर्णपणे स्वदेशी कार होती. याने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडून बाजारात नवा विक्रम प्रस्थापित केला. सुमारे एक दशकानंतर, टाटांनी आणखी एक प्रयोग केला आणि 2008 मध्ये त्यांनी नॅनो कार बाजारात आणली, ज्याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी होती.

जेव्हा लोक भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांचा उल्लेख करतात तेव्हा त्यांच्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे TCS. TCS ही जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान आणि आउटसोर्सिंग सेवा कंपन्यांपैकी एक आहे. ज्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata Passed Away: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास; भारतीय उद्योगाचा महामेरु हरपला

Ratan Tata: सुस्वागतम... मोदींच्या एका मेसेजनंतर रतन टाटांनी नॅनोचा कारखाना गुजरातला कसा नेला?

Ratan Tata Passed Away: टाटांच्या जाण्याने अदानी, अंबानी, महिंद्रा भावुक; भावनांना वाट मोकळी करुन देत वाहिली श्रद्धांजली

Ratan Tata life history : ब्रीच कँडी रुग्णालयातून जेआरडी परतले अन् रतन टाटांना बोलावून घेतलं; 'त्या' सोमवारी घडली ऐतिहासिक घटना

Ratan Tata: तो दिवस नेहमीच लक्षात राहिल... जेव्हा मास्टर-ब्लास्टर सचिनने घेतलेली रतन टाटा यांची भेट

SCROLL FOR NEXT