Ratan Tata Deepfake Video Of His Interview Recommending Investments  Sakal
Personal Finance

Ratan Tata: आलिया प्रियांकानंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Ratan Tata Deepfake Video: रतन टाटा यांनी या व्हिडिओवरून लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

राहुल शेळके

Ratan Tata Deepfake Video: गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक डीपफेक व्हिडिओ समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता, मात्र आता उद्योगपती रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. रतन टाटा यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यामध्ये रतन टाटा गुंतवणूकीचा सल्ला देत आहेत. त्यानंतर खुद्द रतन टाटा यांनी ही मुलाखत खोटी असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियावर रतन टाटा यांचे नाव आणि बनावट व्हिडिओ वापरून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणातील आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये रतन टाटा यांचा एक बनावट व्हिडिओ वापरण्यात आला आहे, ज्यात असे दिसते की रतन टाटा स्वतः गुंतवणूकीचा सल्ला देत आहेत.

Ratan Tata Deepfake Video

पण, बुधवारी टाटांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले आहे तसेच याबाबत लोकांना त्यांनी सावध केले आहे. बुधवारी स्वतः रतन टाटा यांनी या व्हिडिओवरून लोकांना सतर्क केले. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, हा व्हिडिओ खोटा आहे.

डीपफेक म्हणजे काय?

खर्‍या व्हिडिओमध्ये दुसऱ्याचा चेहरा बसवणे याला डीपफेक म्हणतात, ज्यावर लोक विश्वास ठेवू शकतात. डीपफेकद्वारे व्हिडिओ आणि फोटो तयार केले जातात. यामध्ये मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाते. यामध्ये तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने व्हिडिओ आणि ऑडिओ तयार केले जातात.

सोप्या शब्दात समजून घेतल्यास या तंत्रज्ञानामध्ये कोडर आणि डिकोडर तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. डीकोडर प्रथम एखाद्या व्यक्तीच्या चेहर्यावरील हावभाव आणि शरीराची रचना बारकाईने तपासतो.

यानंतर, तो बनावट चेहऱ्यावर लावलो जातो. यामध्ये बनावट व्हिडिओ आणि फोटो तयार केले जाऊ शकतात. आजकाल डीपफेक बनवण्याशी संबंधित अॅप्स बाजारात उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने डीपफेक व्हिडिओ सहजपणे तयार केले जाऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT