Top Tax Payers in India Sakal
Personal Finance

Income Tax: मुकेश अंबानी, गौतम अदानी की रतन टाटा..., सर्वात जास्त कर कोणी भरला?

Top Tax Payers in India: मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत. ते आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारतातील सर्वाधिक कर भरणारे व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या कंपनीने सरकारला 20,713 कोटी रुपयांहून अधिक कर भरला.

राहुल शेळके

Top Tax Payers in India: मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत. ते आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारतातील सर्वाधिक कर भरणारे व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या कंपनीने सरकारला 20,713 कोटी रुपयांहून अधिक कर भरला. रिलायन्सनंतर, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि HDFC बँक अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या आर्थिक वर्षात SBI ने 17,649 कोटी रुपये आयकर भरला. एचडीएफसी बँकेने 15,350 कोटी रुपये आयकर भरला.

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज फॉर्च्युन 500 मध्ये समाविष्ट आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे ज्याचे बाजार भांडवल 19.68 लाख कोटी रुपये आहे.

TCS ने 14,604 कोटी रुपयांचा कर भरला

टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 14,604 कोटी रुपयांचा कर भरला. ही भारतातील दुसरी सर्वात मोठी लिस्टेड कंपनी आहे.

ICICI बँक, भारतातील चौथी सर्वात मोठी कंपनी, आर्थिक वर्ष 2023 साठी 11,793 कोटी रुपयांचा कर भरला. 2023 मध्ये CEO नियुक्त झालेल्या संदीप बक्षी यांनी चंदा कोचर यांच्याकडून बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.

आयटी क्षेत्रातील आणखी एक मोठी कंपनी इन्फोसिसने गेल्या वर्षी 9,214 कोटी रुपयांचा कर भरला होता. इन्फोसिस जगभरातील 56 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. त्याची पायाभरणी एनआर नारायण मूर्ती यांनी केली होती.

टॉप 10 करदात्यांच्या यादीत गौतम अदानींचा समावेश नाही

विशेष म्हणजे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा भारतातील टॉप 10 करदात्यांच्या यादीत समावेश नाही. कारण भारतात कॉर्पोरेट कर हा बाजार भांडवलीकरणापेक्षा नफ्यावर लावला जातो. अदानी समूहाचे बाजार भांडवल बऱ्यापैकी असले तरी ते मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा इतर कंपन्यांप्रमाणे नफा कमवत नाहीत.

महेंद्रसिंग धोनी आणि अक्षय कुमार यांनी सर्वाधिक कर भरला

आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, महेंद्रसिंग धोनीने 38 कोटी रुपयांचा सर्वाधिक कर भरला आहे. त्याच्यानंतर बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आहे, ज्याने 29.5 कोटी रुपये आयकर भरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT