Ratan Tata recounts confronting gangster who targeted Tata Motors  Sakal
Personal Finance

Ratan Tata Latest News : रतन टाटांना मारण्यासाठी दिली होती सुपारी, नेमकं काय घडलं होतं? खुद्द टाटांनीच सांगितला किस्सा

Ratan Tata: रतन टाटा यांनी 1991 मध्ये टाटा समूहाची कमान हाती घेतली होती.

राहुल शेळके

Maharashtra Udyog Ratna Award 2023 : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा हे अनेकदा चर्चेत असतात. नुकताच महाराष्ट्र सरकारने रतन टाटांना ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव केला. अशा परिस्थितीत, त्यांच्याशी संबंधित जुना व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते टाटा समूहाचे अध्यक्ष असताना त्यांच्या सुरुवातीच्या काळात एका गुंडाशी झालेल्या वादाची गोष्ट सांगत आहेत.

रतन टाटा यांनी 1991 मध्ये टाटा समूहाची कमान हाती घेतली होती. ऑटोमोबाईल्स व्यतिरिक्त दळणवळण, रासायनिक क्षेत्रात टाटा समूहाचा हस्तक्षेप वाढला. 2012 पर्यंत ते टाटा सन्सचे अध्यक्ष राहिले. रतन टाटा यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

(Ratan Tata recounts confronting gangster who targeted Tata Motors)

कोलंबिया बिझनेस स्कूलने आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेला व्हिडिओ जवळपास एक दशक जुना आहे. त्यात रतन टाटा यांनी स्वत: टाटा समूहाचे अध्यक्ष असताना जमशेदपूर येथील टाटा मोटर्स प्लांटमध्ये (पूर्वी टेल्को) काम करत असताना एका गुंडाकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी कशी देण्यात आली हे सांगितले आहे.

खतरनाक गुंडाशी सामना

रतन टाटा यांच्या कारकिर्दीची सुरुवात टाटा स्टीलमधून झाली. टाटा स्टील आणि टाटा मोटर्समध्ये काम करत असताना ते जमशेदपूरमध्ये राहत होते. याच दरम्यान ही घटना घडली.

जमशेदपूरमधील टाटा मोटर्समध्ये काम करत असताना एका भयानक गुंडाचा सामना झाल्याचे त्यांनी सांगितले. गुंडाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. टाटा मोटर्सच्या युनियनवर ताबा मिळवण्यासाठी हे प्रयत्न केले जात होते.

मालमत्ता बळकावायची होती

रतन टाटा म्हणाले की, मी चेअरमन झाल्यानंतर 15 दिवसांनी टाटा मोटर्स (पूर्वी टेल्को) मधील आमची युनियन मोठ्या अडचणीत होती. एका गुंडाने ठरवले की युनियनमध्ये भरपूर संपत्ती आहे आणि त्याला ती मिळवायची आहे. ते गुंड खूप भयानक आणि हिंसक होते. गुंडाचे म्हणणे ऐकून घ्या आणि चर्चेतून वाद मिटवा, असे लोक सुचवत होते.

पण मी या सर्व सल्ल्यांकडे दुर्लक्ष करून त्याला सामोरे जाण्याचे ठरवले. त्यावेळी पोलीसही हतबल होते आणि गुंड टाटा मोटर्स प्लांटच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करत असल्याचे त्यांनी सांगितले.

रतन टाटांनी सांगितले की, गुंडाने टाटा मोटर्सच्या काही अधिकाऱ्यांना धमकावण्यासाठी चाकूने हल्ला केला. गुंडाकडून सतत धमक्या येत होत्या. पण मी हार मानायची नाही असे ठरवले होते. ते म्हणाले की, बदमाश गुंड इथेच थांबले नाहीत.

गुंडाने संप पुकारला आणि हल्ल्याच्या भीतीने कामगारांनी कामावर येण्यास नकार दिला. टाटा म्हणाले की, मी स्वत: कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी प्लांटमध्ये राहिलो. यादरम्यान मी बोनस जाहीर केला, त्यानंतर संप मिटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT