Rbi Action On Paytm Payment Bank Know which Services Will Stopped  Sakal
Personal Finance

Paytm: पेटीएम ॲपचे काय होणार? बंद होणार का? RBIच्या कारवाईनंतर तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

Paytm Answers: पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई करत रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन पेमेंट ॲप पेटीएमला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या अनेक सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. RBI ने 29 फेब्रुवारीनंतर टॉप अप ते क्रेडिट ट्रान्झॅक्शनपर्यंत अनेक सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

राहुल शेळके

Paytm Answers: पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई करत रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन पेमेंट ॲप पेटीएमला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या अनेक सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. RBI ने 29 फेब्रुवारीनंतर टॉप अप ते क्रेडिट ट्रान्झॅक्शनपर्यंत अनेक सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आरबीआयच्या या कारवाईनंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि संभ्रम आहेत. पेटीएम बंद होणार का? पेटीएमच्या फास्टॅगचे काय होणार? वॉलेटमध्ये ठेवलेले पैसे कसे वापरणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई का करण्यात आली?

पेटीएम पेमेंट्स बँकेने रिझर्व्ह बँकेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पेटीएम विरोधात कठोर निर्णय घेण्यात आला. (RBI Action on Paytm) 

पेटीएम बंद होणार का?

आरबीआयची ही कारवाई पेटीएम ॲपवर नाही तर पेटीएम पेमेंट बँकेवर केली आहे. म्हणजेच, जर तुम्ही पेटीएम ॲप वापरत असाल आणि पेटीएम पेमेंट बँकेकडून सेवा घेत नसाल तर ॲपवर कोणताही फरक पडणार नाही. 29 फेब्रुवारीनंतरही तुमचे पेटीएम ॲप पूर्वीप्रमाणेच काम करत राहील.

पेटीएम वॉलेट बॅलन्सचे काय होईल?

29 फेब्रुवारीनंतर, तुम्हाला पेटीएम पेमेंट बँकेच्या वॉलेटमधील शिल्लक रकमेसाठी समस्या येऊ शकतात. म्हणून, मर्यादेपूर्वी वॉलेटमधील पैसे काढून घ्या किंवा हस्तांतरित करा.

पेटीएम यूपीआय पेमेंट थांबेल का?

आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई केली आहे. याच्याशी संबंधित सेवांवर परिणाम होणार आहे. 29 फेब्रुवारीनंतर तुम्ही पेटीएम पेमेंट बँकेतून UPI ​​वापरू शकणार नाही. पण तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पेमेंटसाठी इतर बँकांचा UPI आयडी वापरू शकता.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड चालेल की बंद होईल?

आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती दिली की या कारवाईचा NCMC कार्डवर कोणताही परिणाम होणार नाही. तुम्ही नंतरही कार्डमधील राहिलेले पैसे वापरु शकता. पेमेंट सुविधा चांगली करण्यासाठी पेटीएम इतर बँकांशी करार करत आहे.

पेटीएमच्या फास्टॅगचे काय होणार?

पेटीएम फास्टॅग 29 फेब्रुवारीपर्यंत वापरता येईल. यानंतर ते निष्क्रिय होईल. फास्टॅग सेवा सुरू ठेवण्यासाठी पेटीएम इतर बँकांसोबत काम करत आहे. बँकांशी करार करता आला नाही, तर आणखी एक नवीन फास्टॅग खरेदी करावा लागेल.

कर्ज घेणाऱ्यांचे काय होणार?

जर तुम्ही पेटीएम पेमेंट बँकेकडून कर्ज घेतले असेल, तर कर्जाची परतफेड पूर्वीसारखीच राहील. यासाठी पूर्वीप्रमाणेच हप्ते भरले जातील.

पेटीएम आता काय करणार?

पेटीएमची प्रवर्तक कंपनी One97 कम्युनिकेशन इतर बँकांसोबतही काम करत आहे. पेटीएम पेमेंट बँकेवरील कारवाईनंतर त्यांनी इतर बँकांसोबत बोलणी सुरु केली आहे. कंपनी पूर्वीप्रमाणेच थर्ड पार्टी बँकांसोबत काम करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT