Sovereign Gold Bond Scheme Sakal
Personal Finance

Sovereign Gold Bond: RBIची मोठी घोषणा! स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी; काय आहे योजना?

सरकारने सुरू केलेला हा एक विशेष उपक्रम आहे

राहुल शेळके

Sovereign Gold Bond Scheme: बाजारात गुंतवणुकीसाठी इतर आणि चांगले पर्याय असूनही सोन्याची खरेदी कमी झाली नाही. बदलत्या काळानुसार सोने खरेदी आणि गुंतवणूक करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत.

आजच्या काळात, सोन्यातील गुंतवणुकीचा सुरक्षित आणि चांगला परतावा मिळविण्यासाठी सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) किंवा गोल्ड इटीएफ (Gold ETF) हा एक चांगला पर्याय आहे.

तुम्हालाही स्वस्तात सोने घ्यायचे असेल, तर स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी रिझर्व्ह बँक देत आहे. तुम्ही सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत स्वस्त सोने खरेदी करू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी सांगितले की, सार्वभौम सुवर्ण रोखे योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात 19 जून ते 23 जून दरम्यान स्वस्त सोने खरेदी करता येईल. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2023-24 चा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये जारी केला जाईल.

सार्वभौम गोल्ड रोखे योजना काय आहे?

सरकारने सुरू केलेला हा एक विशेष उपक्रम आहे, ज्या अंतर्गत बाजारापेक्षा कमी किंमतीत सोन्यात गुंतवणूक करता येते. ही एक सरकारी सुवर्ण रोखे योजना आहे. (Sovereign Gold Bond Scheme)

ज्यामध्ये गुंतवलेल्या पैशाच्या सुरक्षिततेची हमी भारत सरकारकडून दिली जाते. ही रोखे योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केली आहे.

मी किती सोने खरेदी करू शकतो?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही सार्वभौम सुवर्ण राख्यांमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला किमान एक ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल.

तसेच 4 किलो वैयक्तिक, 4 किलो एचयूएफ आणि 20 किलो ट्रस्टच्या नावावर जास्तीत जास्त गुंतवणूक केली जाऊ शकते. (Sovereign Gold Bond Scheme)

सोने कुठे खरेदी करता येईल?

सार्वभौम सुवर्ण रोखे ​​सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), नियुक्त पोस्ट ऑफिसमधून खरेदी केले जाऊ शकते.

याशिवाय तुम्ही ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेडमधून देखील खरेदी करू शकता.

किती व्याज मिळते?

यामध्ये खरेदी केलेले सोने तुम्ही सध्याच्या दरानेच विकू शकता. या योजनेची मॅच्युरिटी एकूण 8 वर्षांची आहे. ज्यामध्ये तुम्ही 5 व्या वर्षी त्यातून बाहेर पडू शकता.

या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना 2.50 टक्के व्याजदर दिला जातो. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. (Sovereign Gold Bond Scheme)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT