RBI asks payments firms to track high value, suspicious transactions during elections  Sakal
Personal Finance

Loksabha Election: लोकसभा निवडणुकी दरम्यान ऑनलाइन पेमेंटवरही आरबीआयची नजर; मार्गदर्शक सूचना जारी

Loksabha Election Online Payment: भारतीय रिझर्व्ह बँकेने नॉन-बँकिंग पेमेंट सिस्टम ऑपरेटरना इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोडच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. यासोबतच नॉन-बँकिंग पेमेंट सिस्टम ऑपरेटर्सना 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राहुल शेळके

Loksabha Election Online Payment: भारतीय रिझर्व्ह बँकेने नॉन-बँकिंग पेमेंट सिस्टम ऑपरेटरना इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोडच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. यासोबतच नॉन-बँकिंग पेमेंट सिस्टम ऑपरेटर्सना 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, ज्यामध्ये नॉन-बँकिंग पेमेंट सिस्टम ऑपरेटरना मोठ्या रकमेच्या व्यवहारांचा किंवा संशयास्पद व्यवहारांचा मागोवा घेण्यास आणि अहवाल देण्यास सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान डिजिटल पेमेंटच्या वापराबाबत भारतीय निवडणूक आयोग चिंतेत असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना पैसे देण्यासाठी ऑनलाइन पेमेंटचा वापर निधी हस्तांतरित करण्यासाठी केला जाऊ शकतो, असा विश्वास निवडणूक आयोगाला आहे.

आरबीआयने निवडणुकीदरम्यान डिजिटल पेमेंटवर लक्ष ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मध्यवर्ती बँकेने हे देखील स्पष्ट केले आहे की आरबीआयच्या निर्देशांचा उद्देश निवडणुकीत भाग घेणाऱ्या उमेदवारांना निधी हस्तांतरण करणे थांबवणे आहे.

लोकसभा निवडणुका 7 टप्प्यात होत आहेत

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला पार पडले. 7 टप्प्यातील मतदानानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

हे पेमेंट सिस्टम ऑपरेटर आहेत

पेमेंट सिस्टम ऑपरेटर्समध्ये कार्ड नेटवर्क जसे की Visa, MasterCard आणि RuPay तसेच पेमेंट गेटवे जसे की Razorpay आणि Paytm, BharatPe आणि PhonePe सारख्या पेमेंट ॲप्सचा समावेश होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT