RBI Ban on Paytm Payments Bank 1000 account on one PAN latest Marathi News Update  
Personal Finance

RBI Ban on Paytm Payments Bank : एका PAN वर बनवले 1000 अकाउंट... पेटीएमवर झालेल्या कारवाईचं कारण आलं समोर

RBI Ban on Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेवर ३१ जानेवारी रोजी आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. यानंतर फास्टॅग, वॉलेट आणि इतर बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

रोहित कणसे

RBI Ban on Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेवर ३१ जानेवारी रोजी आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. यानंतर फास्टॅग, वॉलेट आणि इतर बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने पेटीएमच्या बँकिंग सर्व्हिस (Paytm Banking Service) २९ फेब्रुवारीनंतर बंद होणार आहे. आरबीआयने नियामंचे उल्लघंन केल्याबद्दल ही निर्बंध लावण्यात आले आहेत. पण अखेर पेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयच्या रडावर कसं आलं याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्यामागे (Ban on Paytm Payments Bank) एक प्रमुख कारण हे कुठलही ओळख न दाखवता कोट्यवधी अकाउंट बनवणे हे आहे. या अकाउंटची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. इतकेच नाही तर कुठलीही ओळख न दाखवता कोट्यवधी रुपयांची देवाण-घेवाण देखील करण्यात आली होती, ज्यामध्ये मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्ट्सनुसार, आरबीआयने बंदी घालण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँक अंतर्गत एकच पॅन कार्डशी तब्बल १००० हून अधिक यूजर्सचे अकाउंट कनेक्ट करण्यात आले होते. यासह आरबीआय आणि ऑडिटर्स दोन्हीकडून करण्यात आलेल्या तपासात पेटीएम बँक नियमांचे पालन करत नसल्याचे देखील समोर आले आहे.

महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी शनिवारी जर फंड्समध्ये फेरफार केल्याचे काही पुरावे सापडले तर ईडी पेटीएम पेमेंट्स बँकेची चौकशी करेल असे सांगितले. यादरम्यान पेटीएमन स्पष्टीकरण देत सांगितलं खी कंपनी आणि वन79 चे सीईओ विजय शेखर शर्मा मनी लॉन्ड्रिंग साठी ईडीच्या कक्षेत नाहीत. कंपनीने सांगितलं की काही व्यापारी चौकशीचा विषय आहेत आणि बँक या प्रकरणात संपूर्ण सहकार्य करत आहे.

भारताच्या स्टॉक एक्सचेंज, बॉम्ब स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)ने डिजीटल पेमेंट फर्म पेटीएमच्या शेअर्सच्या डेली ट्रेडिंगवर बंधने लागू केले आहेत. जी कमी करुन १० टक्के करण्यात आले आहे.कंपनीचे शेअर मागील दोन दिवसात ४० टक्के कोसळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेकडे तब्बल ३५ कोटी ई-वॉलेट आहेत. यामध्ये तब्बल ३१ कोटी अॅक्टिव्ह नाहीयेत, तर फक्त चार कोटी कोणच्याही अमाउंटशिवाय किंवा कमी अमाउंट सह सुरू आहेत. म्हणजेच मोठ्या संख्येने इनअॅक्टिव्ह अकाउंट आहेत. तसेच लाखो अकाउंटचे केवायसी अपडेट झालेले नाहीयेत.

आरबीआयच्या निर्देशांनंतर पेटीएमची मालक असणारी कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स मागील दोन दिवसात ४० टक्के घसरले आहेत. शक्रवारी बीएसईवर स्टॉक २० टक्के घसरून ४८७.०५ रुपयांवर पोहचला आहे. दोन दिवसात कंपनी मार्केट कॅप १७,३७८.४१ कोटी रुपये घसरुन ३०,९३१.५९ कोटी रुपये झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT