RBI Bank esakal
Personal Finance

RBI : रिझर्व्ह बँकेने घेतले तब्बल एवढे टन सोने! अनिश्‍चिततेच्या वातावरणामुळे खरेदीचा धडाका

भारतीय रिझर्व्ह बँकेने या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत तब्बल २४ टन सोन्याची खरेदी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत तब्बल २४ टन सोन्याची खरेदी केली आहे. संपूर्ण २०२३ मधील सोन्याच्या साठ्याच्या तुलनेत त्यात १.५ पट वाढ झाली आहे. वर्ष २०२३ मध्ये १६ टन सोने खरेदी करण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेकडे २६ एप्रिल २०२४ पर्यंत परकी चलन साठ्याचा भाग म्हणून ८२७.६९ टन सोने होते. गेल्या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत ते ८०३.६ टन होते, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

वाढत्या जागतिक अनिश्चिततेमुळे उदयोन्मुख बाजारपेठेतील मध्यवर्ती बँकांनी सोनेखरेदीचा धडाका लावला आहे. भू-राजकीय घडामोडी आणि मंदावलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेमुळे या मध्यवर्ती बँका आव्हानात्मक काळात धोरणात्मक वैविध्याची आवश्यकता असल्याचे संकेत देत आहेत.

या मध्यवर्ती बँकांप्रमाणे, रिझर्व्ह बँकदेखील चलन अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी धोरणात्मक वैविध्य म्हणून राखीव निधीत विविधता आणत आहे. यातील एक महत्त्वाचा घटक म्हणून सोनेखरेदीवरही भर दिला आहे, असे रिझर्व्ह बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ताज्या मासिक अहवालात म्हटले आहे.

एकूण परकी चलनसाठ्यातील सोन्याचा वाटा डिसेंबर २०२३ अखेर ७.७५ टक्के होता, तो एप्रिल २०२४ अखेर सुमारे ८.७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सोन्याचा साठा वाढण्याबरोबरच रिझर्व्ह बँकेला सोन्याच्या भावातील वाढीचादेखील फायदा होत आहे, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

सोनेखरेदीवर विशेष भर

भारत हा जगातील सर्वांत मोठा सोन्याचा ग्राहक म्हणून ओळखला जात असला, तरीही सोन्याचा साठा करण्यात रिझर्व्ह बँक आतापर्यंत फार सक्रिय नव्हती. १९९१ मध्ये, परकी चलन संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या साठ्याचा एक भाग गहाण ठेवला तेव्हा तीव्र टीकेला सामोरे जावे लागले होते.

त्यानंतर बँकेच्या तिजोरीत सर्व सोने परत आले आणि २०१७ पासून रिझर्व्ह बँकेने बाजारातून सोने खरेदी करून त्याचा साठा करण्यास सुरुवात केली. रिझर्व्ह बँकेने २०२२ मध्ये बाजारातून मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी केले. मात्र, २०२३ मध्ये त्याचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर जानेवारी २०२४ पासून पुन्हा रिझर्व्ह बँकेने बाजारातून सक्रियपणे सोनेखरेदी करून साठा वाढविण्यावर भर दिला आहे.

जानेवारी ते मार्च २०२४ या तिमाहीत सोनेखरेदी करणारे देश (टनांमध्ये)

  • तुर्किए - ३०.१२

  • चीन - २७.०६

  • कझाकस्तान- १६

  • ओमान -४

  • किर्गिझस्तान -२

  • सिंगापूर- २

(स्रोत - जागतिक सुवर्ण परिषद),

सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले देश

  • अमेरिका - ८१३३ टन

  • जर्मनी - ३३६६

  • इटली- २४५१

  • फ्रान्स - २४३६

  • रशिया -२२७१ टन

(स्रोत - जागतिक सुवर्ण परिषद), (सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारत नवव्या क्रमांकावर आहे.)

ठळक वैशिष्ट्ये

  • २४ टन भर - जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत

  • ८२७.६९ टन सोने - सध्याचा सोनेसाठा (परकी चलन साठ्याचा भाग)

  • १.५ पट वाढ - २०२३ मधील सोन्याच्या तुलनेत

  • ८०३.६ टन साठा - डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT