rbi cancelled licence of kolhapur based bank shankarrao pujari nutan nagari sahakari bank  Sakal
Personal Finance

RBI Action: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई! 'या' बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

राहुल शेळके

RBI Cancelled License: भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी एका बँकेवर मोठी कारवाई करत तिचा परवाना रद्द केला. ज्या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे ती शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड, महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आहे.

बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. RBI ने बँकेला 4 डिसेंबर 2023 पासून सर्व प्रकारचे व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात अधिकृत निवेदन जारी करून रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर 4 डिसेंबरपासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देऊ शकत नाही.

यासोबतच बँकेत पेमेंट किंवा ठेवी घेण्यावरही पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती देताना सेंट्रल बँकेने सांगितले की, या सहकारी बँकेकडे बँकिंग सेवा देण्यासाठी पुरेसे भांडवल नाही. अशा परिस्थितीत आरबीआयच्या नियमांचे पालन होत नसल्याने आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन आरबीआयने बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर बँकेत जमा झालेल्या ग्राहकांच्या पैशांचे काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बँक ग्राहकांना ठेवीदार विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाची सुविधा मिळते.

DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी आहे जी 5 लाख रुपयांपर्यंत विमा सुविधा प्रदान करते. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांनी 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत जमा केली आहे त्यांना संपूर्ण पैसे परत मिळतील. तर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेले ग्राहक केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Accident : खंबाटकी घाटात भीषण अपघात! ब्रेकफेल झालेल्या कंटेनरने आठ गाडयांना उडवले: दोन जण गंभीर जखमी

Dharavi: धारावी मशीद प्रकरण; दंगल भडकवणाऱ्या पोस्ट व्हायरल, तिघांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

Maratha Reservation : मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे आश्वासन… बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?

Latest Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये दाखल होण्यापूर्वी भारतीयांकडून ढोल-ताशांचा गजर

मयंक अगरवालच्या भारत अ संघाने जिंकली Duleep Trophy; रोमांचक सामन्यात सुदर्शनच्या शतकानंतरही ऋतुराजच्या संघाचा पराभव

SCROLL FOR NEXT