RBI cancels licence of Mumbai-based The City Co-operative Bank  Sakal
Personal Finance

RBI Action: आजपासून 'या' बँकेतून पैसे काढता येणार नाहीत; आरबीआयने केली मोठी कारवाई, काय आहे प्रकरण?

Bank Licence Cancelled: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून बँकांवर कठोर कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आरबीआयने बुधवारी आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे.

राहुल शेळके

Bank Licence Cancelled: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून बँकांवर कठोर कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आरबीआयने बुधवारी आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. 19 जून 2024 पासून बँकेचे कामकाज बंद झाले आहे. म्हणजेच 20 जूनला सकाळी बँकेत जाणाऱ्यांना खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. यावेळी मुंबईच्या सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे.

DICGC कडून 5 लाख रुपये मिळण्याचा अधिकार

आरबीआयने दिलेल्या माहितीत, महाराष्ट्राचे सहकार आयुक्त आणि निबंधक यांना बँक बंद करण्याचे आदेश जारी करून त्यासाठी लिक्विडेटरची नियुक्ती करण्यास सांगण्यात आल्याचे म्हटले आहे. बँक बंद झाल्यास, प्रत्येक खातेदाराला ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून 5 लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या ठेवींच्या ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल.

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 230.99 कोटी रुपये आधीच दिले गेले आहेत. मुंबईस्थित सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

बँकेचा कारभार असाच सुरू राहिल्यास लोकांवर विपरित परिणाम होईल

मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे बँक आपल्या खातेधारकांना पूर्ण पेमेंट करू शकणार नाही. बँकेला आपले कामकाज पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिल्यास त्याचा लोकांवर विपरीत परिणाम होईल. बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे, सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेला बँकिंगचा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT