RBI gives 15-day relaxation to Paytm payment Bank extends timeline till date to 15th March releases faq Paytm Crisis Marathi News  
Personal Finance

Paytm Payments Bank Crisis : आरबीआयचा पेटीएम पेमेंट बँकेला मोठा दिलासा; 'त्या' आदेशात दिली 15 दिवसांची सूट

RBI On Paytm Update: रिझर्व्ह बँकेने पेटीएमला मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयकडून 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएमवर निर्बंध लादण्यात आले होते.

रोहित कणसे

RBI On Paytm Update: रिझर्व्ह बँकेने पेटीएमला मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयकडून 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएमवर निर्बंध लादण्यात आले होते. यानंतर आता आरबीआयने पेटीएमला 15 मार्च 2024 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे.

31 जानेवारी 2024 रोजी जारी केलेल्या आदेशात आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली होती. पेटीएम पेमेंट बँकेविरुद्ध अनियमितता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. RBI ने पेटीएम पेमेंट बँकेबाबत FAQ देखील जारी केले आहेत.

बँकिंग सेक्टर रेग्यूलटर आरबीआयने ने 16 फेब्रुवारी 2024 रोजी एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने 31 जानेवारी 2024 रोजी बँकिंग नियमन कायद्यांतर्गत पेटीएम पेमेंट बँकेवर अनेक निर्बंध लादले होते. परंतु ग्राहक आणि दुकानदारांचे हित लक्षात घेऊन, पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेला आणखी काही वेळ देण्यासाठी आपल्या जुन्या आदेशात काही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पेटीएम पेंमेंट बँकेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की यापूर्वी असे म्हटले होते की 29 फेब्रुवारी 2024 नंतर ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये कोणतीही रक्कम जमा करता येणार नाही आणि क्रेडिट ट्राजॅक्शन किंवा टॉपअप करता येणार नाही. मात्र आता हा आदेश 15 मार्च 2024 पासून लागू होईल. आरबीआयने सांगितले की, ग्राहकांच्या वॉलेटमध्ये शिल्लक असलेली रक्कम संपेपर्यंत वापरली जाऊ शकते. ग्राहकांना पैसे काढण्याचे आणि वापरण्याचे स्वातंत्र्य असेल. यासाठी निश्चित कालमर्यादा नाही.

मात्र, 29 फेब्रुवारी 2024 पूर्वी पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे चालवले जाणारे One97 कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडची नोडल अकाउंट बंद करण्याचा आदेश लागू राहील. तसेच, RBI ने 15 मार्च 2024 पर्यंत पाइपलाइनमध्ये असलेले सर्व व्यवहार आणि नोडल अकाउंट निकाली काढण्याच्या अंतिम मुदतीत कोणताही बदल केलेला नाही.

पेटीएम पेमेंट बँकेला सूचना

आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की पेटीएम पेमेंट्स बँकेने कोणत्याही खात्यात किंवा वॉलेटमधील शिल्लक रक्कम काढण्यासाठी मदत करावी. ज्या खात्यांवर तपास यंत्रणा कारवाई करत आहेत किंवा कोणत्याही न्यायिक अथॉरिटीच्या अंतर्गत खटला प्रलंबित आहे त्यांना वगळले जावे. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला पार्टनर बँकेत जमा केलेले ग्राहकांचे पैसे काढण्यासाठी मदत करण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT