RBI governor cautions on inflation outlook amid volatile food prices and weather shocks  Sakal
Personal Finance

RBI on Inflation: खाद्यपदार्थांच्या किंमतींबाबत आरबीआय चिंतेत; गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले...

RBI on Inflation: अन्नधान्याच्या किंमतीतील अस्थिरता आणि अनिश्चिततेमुळे महागाई वाढ होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकत्याच झालेल्या एमपीसीच्या बैठकीत ही माहिती दिली.

राहुल शेळके

RBI on Inflation: अन्नधान्याच्या किंमतीतील अस्थिरता आणि अनिश्चिततेमुळे महागाई वाढ होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकत्याच झालेल्या एमपीसीच्या बैठकीत ही माहिती दिली.

गव्हर्नर दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) बैठक 6 ते 8 डिसेंबर दरम्यान झाली. महागाईशी संबंधित चिंतेचा हवाला देत मुख्य व्याजदर (रेपो) 6.5 टक्के ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

भाज्यांचे दर पुन्हा वाढू लागले आहेत

शुक्रवारी झालेल्या बैठकीत गव्हर्नर म्हणाले, "अस्थिर आणि अनिश्चित भाज्यांच्या किंमती आणि नियमित अंतराने येणारे हंगामी धक्के महागाईवर परिणाम करतील अशी अपेक्षा आहे." ते म्हणाले की, भाज्या पुन्हा महाग होतील. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत चलनवाढ रोखावी लागेल यावरही गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भर दिला. डेप्युटी गव्हर्नर आणि एमपीसी सदस्य मायकल देवव्रत पात्रा यांनी सांगितले की, आर्थिक धोरण अत्यंत सावध असले पाहिजे.

आरबीआयचे कार्यकारी संचालक आणि एमपीसी सदस्य राजीव रंजन म्हणाले की अर्थव्यवस्था पूर्ण वेगाने धावत आहे आणि वाढ चांगली झाली आहे.

एमपीसीची पुढील बैठक 6 ते 8 फेब्रुवारीला

MPC मध्ये तीन RBI सदस्य आणि तीन बाह्य सदस्य असतात. शशांक भिडे, आशिमा गोयल आणि जयंत आर वर्मा यांची सरकारने नियुक्ती केली आहे.

या तिघांनीही रेपो दरात बदल न करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. डिसेंबरमध्ये सलग पाचव्या बैठकीत रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला होता. एमपीसीची पुढील बैठक 6 ते 8 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT