RBI Governor Shaktikanta Das Sakal
Personal Finance

RBI Governor: महागाई, शेअर बाजार, बँका, रोजगार आणि व्याजदर कपात...; RBIचे गव्हर्नर शक्तीकांत दास काय म्हणाले?

राहुल शेळके

RBI Governor Shaktikanta Das: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी महागाई, शेअर बाजार, बँका आणि व्याजदर कपात यावर भाष्य केलं आहे. दास यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या मुद्यांवर भाष्य केले आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, महागाई 4% च्या खाली आली असली तरी व्याजदर कधी कमी होतील हे सांगणे कठीण आहे.

शक्तीकांत दास यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत भारताचा वार्षिक विकास दर 8% पेक्षा जास्त आहे, या वर्षी RBI च्या अंदाजानुसार तो 7.2% असेल. युक्रेन युद्धानंतर, महागाई 7.8% वर पोहोचली होती, सध्या महागाई 3.5% आहे.

महागाई आपल्या मर्यादेत आहे आणि भारताच्या विकासाचा वेगही चांगला आहे. वित्तीय क्षेत्र, मग ते बँकिंग क्षेत्र असो किंवा NBFC क्षेत्र, 5-6 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज अधिक मजबूत, अधिक स्थिर आहे.

किमतींच्या स्थिरतेकडे लक्ष द्यावे लागेल

2047 पर्यंत भारत कसा विकसित होईल, आव्हाने कोणती आहेत आणि ती गाठण्यासाठी आवश्यक असलेला विकास दर कसा साधला जाईल, यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, सर्वप्रथम आपल्याला किमतींच्या स्थिरतेकडे म्हणजेच महागाईकडे लक्ष द्यावे लागेल.

महागाई 4% च्या आसपास ठेवावी लागेल. कारण किमतीत स्थिरता असेल तर लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, लोकांच्या हातात क्रयशक्ती वाढेल आणि लोकांकडे खरेदीसाठी जास्त पैसा येईल. शक्तीकांता दास म्हणाले की, किमतीत स्थिरता असेल तर त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही वाढतो, म्हणजेच वाढीला सर्वात मोठा आधार किंमत स्थिरतेतून मिळतो.

दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक स्थिरता. बँका आणि एनबीएफसींचे आरोग्य चांगले असले पाहिजे आणि संपूर्ण आर्थिक क्षेत्राचे आरोग्यही चांगले असले पाहिजे.

अनेक सुधारणा करण्याची गरज

शक्तिकांता दास म्हणाले की, गेल्या काही वर्षांत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्यापैकी आर्थिक धोरण ही सर्वात मोठी संरचनात्मक सुधारणा आहे. IBC कोड देखील एक मोठी सुधारणा आहे. याशिवाय मेक इन इंडिया, पीएलआय योजना यासारखे अनेक उपक्रम हाती घेतले गेले आहेत, ज्यामुळे उत्पादन क्षेत्राला खूप मदत झाली आहे.

शक्तिकांता दास म्हणाले की, राज्य पातळीवर अनेक सुधारणा करण्याची गरज आहे. उदाहरण देत त्यांनी कृषी बाजार क्षेत्र, कृषी पुरवठा साखळी क्षेत्र आणि कामगार क्षेत्रात सुधारणांची गरज असल्याचे स्पष्ट केले.

रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत

शक्तिकांता दास म्हणाले की, भारतात इनोव्हेशन, स्टार्टअप्स, फिनटेक खूप चांगले काम करत आहेत आणि येथे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. ते म्हणाले की, कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढले पाहिजे, जरी आपण कृषी क्षेत्रात प्रगती केली असली तरी कृषी उत्पादकता आणि उत्पादनात आपण खूप सुधारणा करू शकतो.

शक्तीकांत दास म्हणाले की, भारताच्या सेवा क्षेत्रातील निर्यातीमुळे जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटत आहे. आपल्याला उत्पादनात चांगले काम करायचे आहे. भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

परंतु भविष्यात आपल्याला आणखी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. बँकांच्या घटत्या ठेवींच्या वाढीबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, बँकिंग क्षेत्राचा विचार करता, गेल्या 5-6 वर्षात रिझर्व्ह बँकेने बँका आणि एनबीएफसींना खूप प्राधान्य दिले आहे.

तरुण पिढी महत्त्वाकांक्षी आहे

शक्तिकांता दास म्हणाले की, हे तंत्रज्ञानाचे युग आहे, तरुण पिढी महत्त्वाकांक्षी आहे, ते इतर बाजारपेठेकडे आकर्षित होत आहेत, त्यात गैर काहीच नाही. तरुण जर शेअर मार्केटमध्ये जात असेल, विमा उत्पादने खरेदी करत असेल, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असेल, तर ती चांगली गोष्ट आहे, ती व्हायला हवी. पण आम्ही फक्त बँकांनाच त्यावर लक्ष ठेवायला सांगतो, पण पुढे जाऊन तरलतेची मोठी समस्या उद्भवू शकते.

याचा अर्थ, ठेव आणि पत वाढ यांच्यातील अंतर वाढत राहिल्यास तरलतेच्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे बँकांनी तरलता व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. बँकांनी पत आणि ठेवीतील वाढ यात समतोल साधला पाहिजे.

अनेक बँकांनी इन्फ्रा बाँड जारी केले

शक्तीकांत दास म्हणाले की, अलीकडच्या काळात एक चांगली गोष्ट घडली आहे की अनेक बँका इन्फ्रा बाँडद्वारे पैसे उभारत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्सची चांगली गोष्ट म्हणजे त्या ठेवी नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी कोणताही राखीव निधी ठेवण्याची गरज नाही आणि ते दीर्घ मुदतीसाठी आहेत. याचा फायदा बँकांना होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata Passed Away: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास; भारतीय उद्योगाचा महामेरु हरपला

Ratan Tata: सुस्वागतम... मोदींच्या एका मेसेजनंतर रतन टाटांनी नॅनोचा कारखाना गुजरातला कसा नेला?

Ratan Tata Passed Away: टाटांच्या जाण्याने अदानी, अंबानी, महिंद्रा भावुक; भावनांना वाट मोकळी करुन देत वाहिली श्रद्धांजली

Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

Ratan Tata life history : ब्रीच कँडी रुग्णालयातून जेआरडी परतले अन् रतन टाटांना बोलावून घेतलं; 'त्या' सोमवारी घडली ऐतिहासिक घटना

SCROLL FOR NEXT