RBI governor Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास हे जगातील बँकर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आले आहे. अमेरिकास्थित ग्लोबल फायनान्स मासिकाने त्यांना जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिले आहे.
ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड 2023 मध्ये शक्तीकांता दास यांना A+ मानांकन देण्यात आले आहे. शक्तिकांता दास यांच्यानंतर स्वित्झर्लंडचे थॉमस जे जॉर्डन दुसऱ्या स्थानावर तर व्हिएतनामचे गुयेन थी हांग तिसऱ्या स्थानावर आहे.
ग्रेड कोणत्या आधारावर दिली जाते?
ग्लोबल फायनान्स मासिक जगभरातील केंद्रीय बँकर्सवर A ते F पर्यंत अहवाल तयार करते. ग्रेड ठरवण्याचे प्रमाणही वेगळे असते. अमेरिकेच्या नियतकालिकाने एका प्रकाशनात म्हटले आहे की उत्कृष्ट कामगिरीसाठी ए ग्रेड दिला जातो, तर अपयशासाठी एफ दिला जातो. महागाई नियंत्रण, आर्थिक विकासाची उद्दिष्टे, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापनाच्या आधारे A ते F ग्रेड दिली जाते.
101 देशांच्या केंद्रीय बँकर्सचा अहवाल
1994 पासून, हे मासिक दरवर्षी सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड सादर करत आहे. या अहवालांतर्गत, 101 मुख्य देश, प्रदेश आणि जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये युरोपियन युनियन, इस्टर्न कॅरिबियन सेंट्रल बँक, बँक ऑफ सेंट्रल आफ्रिकन स्टेट्स आणि सेंट्रल बँक ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले
या सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शक्तिकांत दास यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, शक्तीकांत दास यांचे समर्पण आणि दूरदृष्टी आपल्या देशाला बळकट करत राहील.
ए ग्रेड मिळालेल्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांमध्ये ब्राझीलचे रॉबर्टो कॅम्पोस नेटो, इस्रायलचे अमीर यारॉन, मॉरिशसचे हरवेश कुमार सीगोलम, न्यूझीलंडचे एड्रियन ऑर, पॅराग्वेचे जोस कॅन्टेरो सिएन्ना, पेरूचे ज्युलिओ वेलार्डे, तैवानचे चिन-लाँग आणि यांग यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.