RBI  Sakal
Personal Finance

Gold Price: आरबीआयने पाच महिन्यांत केली 28 टन सोन्याची खरेदी; काय आहे रिझर्व्ह बँकेचा प्लॅन?

राहुल शेळके

Gold Price: जगभरातील केंद्रीय बँका वेगाने सोन्याची खरेदी करत आहेत. यामध्ये आरबीआयही मागे नाही. मे पर्यंत रिझर्व्ह बँकेने 28 टन सोन्याची खरेदी केली आहे. बँकेने मे महिन्यात तीन टन सोने खरेदी केले. त्याआधी एप्रिलमध्ये मध्यवर्ती बँकेने सुमारे सहा टन सोने खरेदी केले आणि सात अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन ट्रेझरी सिक्युरिटीज विकल्या. RBI आपल्या परकीय चलन राखीव पोर्टफोलिओमध्ये विविधता आणत आहे.

RBI ची रणनीती जगातील इतर प्रमुख केंद्रीय बँकांच्या धोरणाशी सुसंगत आहे. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे या बँका त्यांच्या साठ्यातील सोन्याचे प्रमाण वाढवत आहेत आणि डॉलरच्या मालमत्तेतील वाटा कमी करत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, विदेशी केंद्रीय बँकांनी यूएस ट्रेझरी सिक्युरिटीजमधील त्यांचा वाटा 30 बिलियन डॉलरने कमी केला आहे.

दुसरीकडे, जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की केंद्रीय बँकांनी जानेवारी-मार्च तिमाहीत जागतिक स्तरावर विक्रमी 290 टन सोन्याची खरेदी केली आहे. या कालावधीत, चीन आणि तुर्कीच्या मध्यवर्ती बँकांनी जास्तीत जास्त खरेदी केली. आरबीआयने डिसेंबर 2017 पासून बाजारातून सोन्याची नियमित खरेदी सुरू केली. पण युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील तणावामुळे बँकेने गेल्या दोन वर्षांत आपल्या खरेदीचा वेग वाढवला आहे.

बँका सोन्याचा साठा का वाढवत आहेत?

मात्र या वर्षी जानेवारीपासून आरबीआयने सोने खरेदीत चांगलीच गती दाखवली आहे. मध्यवर्ती बँकेने मे महिन्यापर्यंत 28 टन सोन्याची खरेदी केली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेने 2024 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, केंद्रीय बँकांनी सोने खरेदी करण्यामागे तीन मुख्य कारणे आहेत.

पहिले कारण म्हणजे सोन्याचे दीर्घकालीन मूल्य. दुसरे कारण म्हणजे संकटाच्या वेळी सोन्याची चमक नेहमीच वाढते. तिसरे कारण म्हणजे सोन्याने पोर्टफोलिओमध्ये प्रभावी भूमिका बजावली आहे. आरबीआय एक धोरणात्मक पाऊल म्हणून सोन्याचे प्रमाण वाढवत आहे. सोन्याची केलेली खरेदी महागाई आणि परकीय चलनाच्या जोखमीपासून बचाव म्हणून पाहिले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT