RBI Sakal
Personal Finance

RBI: आरबीआयने एडलवाईस ग्रुपवर केली मोठी कारवाई; समूहाच्या 2 कंपन्यांना ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

Edelweiss Group: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एडलवाईस ग्रुपवर मोठी कारवाई केली आहे. ईसीएल फायनान्स आणि एडलवाइज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी या दोन समूह कंपन्यांच्या व्यवहारावर बंदी घालण्यात आली आहे.

राहुल शेळके

Edelweiss Group: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एडलवाईस ग्रुपवर मोठी कारवाई केली आहे. ईसीएल फायनान्स आणि एडलवाईस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी या दोन समूह कंपन्यांच्या व्यवहारावर बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने बुधवारी सांगितले की, या दोन कंपन्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये अनियमितता आढळून आली आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मध्यवर्ती बँकेने SARFAESI कायदा (आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002) अंतर्गत आपले अधिकार वापरून हे निर्बंध लादले आहेत.

एडलवाईस ग्रुपच्या या कंपन्यांच्या व्यवसायावर आरबीआयने अनेक निर्बंध लादले आहेत. यामध्ये ईसीएल फायनान्स लिमिटेडला त्यांच्या घाऊक व्यवसायाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे कंपनी खाती बंद करणे किंवा कर्जाची परतफेड करण्याव्यतिरिक्त इतर कामे करू शकते.

ईसीएल फायनान्स लिमिटेडच्या तपासणीदरम्यान, आरबीआयला असे आढळून आले की कंपनीने त्यांच्या कर्जाच्या पुस्तकात चुकीची माहिती दिली आहे. तसेच कंपनीने KYC मार्गदर्शक तत्त्वे नीट पाळली नाहीत. त्यामुळे कंपनीच्या व्यवहारावर बंदी घालण्यात आली आहे. RBI च्या अनेक तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल एडलवाईस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, वर्षाच्या सुरुवातीलाच सेंट्रल बँकेने दोन NBFC JM Financial Products आणि IIFL Finance यांच्यावर कारवाई केली होती. तेव्हापासून अन्य कंपन्यांवर कारवाई होण्याची भीती व्यक्त केली जात होती. याशिवाय पेटीएम पेमेंट्स बँकेवरही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने कारवाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी पुन्हा आंदोलन

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT